विरार : वय अवघे अडीच वर्ष... या वयात मुलांना नीट बोलताही येत नाही; परंतु याही वयात जिल्हे, राजधानी, एक ते १०० इंग्रजी अंक, जगातील २७ ऐतिहासिक स्थळे व त्याची माहिती, फळे, भाज्या, फुले ओळखणे, राष्ट्रगीत (National Anthem) आदी फडान् फड सांगतो, बोलतो. ही गोष्ट आहे ठाण्यात राहणाऱ्या प्रयाण सोनकुसरे (Prayan sonkusare) याची. चिमुकल्या प्रयाणच्या या बुद्धिमतेची दखल (India book of records) `इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड`ने घेतली आहे.
अडीच वर्षांच्या प्रयाण सोनकुसरे याची बुद्धिमत्ता अफाट आहे. या वयात मुलांना नीट बोलता येत नाही, परंतु समोरच्याला तो अचंबित करतो. `बाळाचे पाय पाळण्यात दिसतात`, हे प्रयाणला तंतोतंत लागू पडते. कारण जिल्हे, राजधानी आदींबरोबरच ४० प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व, मराठी अंक ओळख, विविध ११ शोधकर्ते त्यांची नावे व काम, २७ स्वातंत्र्य सैनिकांची नावे, इंग्रजी अक्षरे ओळखणे, ४४ देशांचे नकाशे व त्यांची वैशिष्ट्येही तो अचूक सांगतो. त्याच्या या गुणांची दखल इंडिया बुक ऑफ रेकार्डने घेतली असून, त्याचे नाव रेकॉर्डवर घेतले आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डतर्फे प्रयाणला प्रशस्तिपत्रक आणि मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
प्रयाणचे वडील सुहेल व आई श्रुती सोनकुसरे हे उच्चशिक्षित आहेत. ते मूळचे नागपूरचे; परंतु सध्या ठाण्यात राहतात. प्रयाणचे शालेय शिक्षणही सुरू झालेले नाही, अशी माहिती त्याचे वडील सुहेल यांनी दिली. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हणतात, तसेच काहीसे प्रयाणच्या बाबतीत म्हणावे लागेल, असे ते सांगतात.
तो १५ महिन्यांचा होता, तेव्हापासूनच त्याला फोटो बघून माणसे ओळखण्याची कला अवगत झाल्याचे त्याची आई श्रुती यांनी `सकाळ`शी बोलताना सांगितले. त्यामुळे त्याचा अभ्यास हा त्याप्रमाणे घायला सुरुवात केली. हे करत असतानाच त्याच्या प्रगतीवरही लक्ष ठेऊन होतो. त्यात तो लवकर प्रगती करताना दिसला. आता तर तो काही श्लोकही बोलून दाखवत आहे, असे श्रुती यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.