Dombivli Crime : मेडीकल परवाना मंजुर करण्यासाठी लाचेची मागणी; औषध निरिक्षक अटकेत

Dombivli Crime : कल्याण पश्चिमेतील डी मार्ट समोर सापळा रचून सोमवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.
Two arrested for demanding bribe to get license of medical shop Dombivli Crime News rak94
Two arrested for demanding bribe to get license of medical shop Dombivli Crime News rak94
Updated on

डोंबिवली : मेडीकल दुकानाचा परवाना मंजुर करण्यासाठी 70 हजार रुपयांची लाच घेताना ठाणे अन्न आणि औषध प्रशासनाचे औषध निरिक्षक संदीप नरवणे (वय 42) व मध्यस्ती करणारा सुनील चौधरी (वय 57) यांना नवी मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. कल्याण पश्चिमेतील डी मार्ट समोर सापळा रचून सोमवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.

नविन सुरु करत असलेल्या मेडिकलचा परवाना मंजुर करण्याकरिता लोकसेवक नरवणे हे एक लाख रुपयांची लाच मागत असल्याची तक्रार नवी मुंबई लाच लुचपत विभागाकडे सोमवारी दाखल झाली होती. शासकीय फी व्यतिरिक्त स्वतःसाठी नरवणे हे संबंधित व्यावसायिकाकडे लाचेची मागणी करत होते.

Two arrested for demanding bribe to get license of medical shop Dombivli Crime News rak94
Worli Hit And Run Case: वरळी 'हिट अँड रन' प्रकरणी मोठी घडामोड! फरार मिहीर शहाला अखेर अटक

तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंचासमक्ष करण्यात आलेली लाचेची सतत्या पडताळली. यावेळी लोकसेवक नरवणे हे तडजोडी अंती 70 हजार रुपये स्विकारण्यास तयार असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नवी मुंबई यांनी कल्याण येथील डि मार्ट जवळ सापळा रचून नरवणे यांच्या उपस्थितीत 70 हजार रुपयांची लाच स्विकारताना सुनील चौधरी या दोघांना अटक केली. लाचलुचपत प्रतिबंध विभाग नवी मुंबई यांनी दिलेल्या तक्रारीनुसार महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com