लसीच्या दोन डोसनंतर मुंबईत इतक्या लोकांना झाली कोरोनाची बाधा

BMC च्या सर्वेमधून काय आलं समोर?
लसीच्या दोन डोसनंतर मुंबईत इतक्या लोकांना झाली कोरोनाची बाधा
Updated on

मुंबई: कोरोना प्रतिबंधक लसीचे (vaccine) दोन डोस घेणं आवश्यक आहे. काहीजण पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोसकडे दुर्लक्ष करतात. कोरोनाचे दोन डोस घेण्याचे फायदे आहेत. त्यामुळे कोरोनाची (corona infection) लागण होण्याची शक्यता अत्यंत कमी होते. मुंबई महापालिकेने (BMC) केलेल्या सर्वेक्षणातून (survey) ही बाब समोर आली आहे. लसीचे दोन डोस घेतलेल्यांचा कोरोनापासून बचाव होत असल्याचे समोर आले आहे. (Two jabs protect shows survey of Covid-hit in Mumbai)

कोरोना प्रतिबंधक लसीच्या पहिल्या डोसचा परिणाम होतो. पण दुसऱ्या डोसचा त्याहीपेक्षा जास्त फायदा होतो. मुंबई महापालिकेने एक जानेवारी ते १७ जून दरम्यान मुंबईतील २.९ लाख कोविड रुग्णांचे सर्वेक्षण केले. दुसरा डोस घेतल्यानंतर फक्त २६ जणांना कोरोनाची पुन्हा बाधा झाली, तर पहिला डोस घेतलेल्या १०,५०० जण कोविडची बाधा झाली.

लसीच्या दोन डोसनंतर मुंबईत इतक्या लोकांना झाली कोरोनाची बाधा
लोकलमध्ये खोट्या ID वर प्रवास, ३ हजार जणांना पकडलं!

BMC च्या वॉर रुम्सनी डाटाचे एकत्रीकरण केले. १ जानेवारी ते १७ जून दरम्यान मुंबईत एकूण ३.९५ लाख नागरिकांना कोविडची बाधा झाली. यात दुसऱ्या लाटेतील रुग्ण जास्त होते. या वॉर रुम्सना ३.९५ लाख कोविड बाधितांपैकी होम आयसोलेशनमध्ये असलेल्या २.९ लाख कोविड बाधितांशी संपर्क साधता आला. "'गोळा केलेल्या माहितीवरुन, बहुसंख्य लोकसंख्येमध्ये कोविडचं गंभीर इन्फेक्शन रोखण्यामध्ये लसी प्रभावी ठरल्याचं दिसून आलं आहे. रुग्णालयात असलेल्या पेशंटची माहिती मिळाल्यानंतर चित्र आणखी स्पष्ट होईल. या डाटाचं एकत्रीकरण सुरु आहे" असं अधिकाऱ्याने सांगितलं.

लसीच्या दोन डोसनंतर मुंबईत इतक्या लोकांना झाली कोरोनाची बाधा
ट्रेनखाली जाणार होता, पण 'तिच्या' चपळाईमुळे वाचले प्राण

सरकारच्या ताज्या आकडेवारीनुसार, मुंबईत आतापर्यंत ५३.८३ लाख लोकांचं लसीकरण झालं आहे. त्यात १० लाख नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. "लोकांच्या एका मोठ्या गटाला लसीपासून संरक्षण मिळतय. संपूर्ण लसीकरण झाल्यानंतर मृत्यूचे प्रमाणही नगण्य आहे" असे डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()