Navi Mumbai: मानसिक आणि अभ्यासाचा ताण वाढला म्हणून २ अल्पवयीन मुलांनी उचलले टोकाचे पाऊल

Death
Deathesakal
Updated on

Navi Mumbai: नेरूळ भागात राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांनी ताण असह्य झाल्याने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. दर्शील पाटील (वय १५) व पृथ्वी ढवळे (वय १४) अशी दोघांची नावे आहेत.

एका मुलाने मानसिक तणावाखाली येऊन आत्महत्या केली. दुसऱ्याने अभ्यासाचा ताण सहन न झाल्याने जीवन संपवले. पोलिसांकडून दोन्ही घटनांचा अधिक तपास करण्यात येत आहे.

Death
Navi Mumbai: टाकी साफ करणाऱया कामगाराचा चौथ्या मजल्यावरुन पडून मृत्यू

करावे गावात राहणारा दर्शील नेरूळमधील शाळेत दहावीत शिकत होता. वर्षभरापूर्वीच त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यानंतर सर्व जण त्याच्याकडून चांगला अभ्यास करून शिक्षण घेण्याची आणि आई व बहिणीचा सांभाळ करण्याची अपेक्षा करत होते.

अभ्यासात मन लागत नसल्याने मानसिक तणावाखाली आलेल्या दर्शीलने सोमवारी पहाटे करावे गावालगतच्या तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. त्यापूर्वी रविवारी मध्यरात्री त्याने आपण कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नसल्यामुळे आत्महत्या करत असल्याचा मेसेज बहिणीच्या मोबाईलवर पाठवला होता. सोमवारी अग्निशमन दलाच्या जवानांना तलावात त्याचा मृतदेह आढळला. एनआरआय पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.

Death
Navi Mumbai: नवी मुंबईत 48 तासांत 6 मुलं बेपत्ता; पालकांमध्ये भीतीचे वातावरण

दुसऱ्या घटनेत नेरूळ सेक्टर-१६ मध्ये राहणाऱ्या पृथ्वी ढवळे याने रविवारी सायंकाळी आत्महत्या केली. पृथ्वी नववीत शिकत होता. आई-वडील व बहीण बाजारात गेले असताना त्याने बेडशीटच्या साह्याने पंख्याला गळफास लावून जीवन संपवले.

रात्री पावणेदहाच्या सुमारास त्याचे आई-वडील घरी परतल्यांनतर आत्महत्येचा प्रकार लक्षात आला. पृथ्वीने आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी सापडली असून त्यात त्याने अभ्यास होत नसल्याचे म्हटले आहे. त्यावरून त्याने अभ्यासाचा ताण सहन न झाल्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. नेरूळ पोलिस अधिक तपास करत आहेत.

Death
Navi Mumbai: केरळचे नागरिक झाले नवी मुंबईचे फॅन; बातमी वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.