नवी मुंबईकरांच्या सेवेत दोन मोबाईल टॉयलेट बसेस; पालिकेची कौतुकास्पद कामगिरी

नवी मुंबईकरांच्या सेवेत दोन मोबाईल टॉयलेट बसेस; पालिकेची कौतुकास्पद कामगिरी
Updated on

नवी मुंबई : स्वच्छ सर्वेक्षण 2021ला नवी मुंबई महापालिका सामोरे जाताना स्वच्छताविषयक विविध अभिनव उपक्रम राबवित आहे. त्या अनुषंगाने स्वच्छतेचाच महत्वाचा भाग असलेल्या शौचालयांकडेही महापालिका विशेष लक्ष देत असून शौचालयांविषयी अभिनव संकल्पना राबवित 'एमएमटी'च्या दोन वापरात नसलेल्या बसेसचे कलात्मक रूपांतरण करून त्याचा वापर मोबाईल टॉयलेटमध्ये करण्यात आलेला आहे. अशा दोन अप सायकल आर्ट टॉयलेट बसेस मंगळवारपासून नवी मुंबईकरांच्या सेवेत दाखल करण्यात आले.  

या वापरात नसलेल्या दोन 'एनएमएमटी' बसेसचे रूपांतरण करून तयार करण्यात आलेल्या मोबाईल टॉयलेटचे लोकार्पण अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांच्या हस्ते महापालिका मुख्यालयात करण्यात आले. याप्रसंगी प्रशासन विभागाचे उपआयुक्त दादासाहोब चाबुकस्वार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, समाजविकास विभागाच्या उपआयुक्त क्रांती पाटील, उप मुख्य स्वच्छता अधिकारी प्रल्हाद खोसे, उपअभियंता वसंत पडघन आणि इतर उपस्थित होते. 

 या दोन्ही वापरात नसलेल्या बसेसचे मे. सारा फ्लास्ट प्रा.लि. यांनी मोबाईल टॉयलेटमध्ये रूपांतरण केले असून ग्लोबल ग्रीन इनोव्हेटर्स यांनी अत्यंत आकर्षक रितीने अप सायकल आर्ट टॉयलेट बस कलात्मक स्वरूपात साकारली आहे. या कलात्मकतेमध्ये जसपाल सिंग नोएल. बिनॉय के, निखील एम. आणि आर्टिस्ट संकल्प पाटील, सुधीर शेडगे व वैभव घाग यांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. 

या दोन्ही विनावापर बसेसचे मोबाईल टॉयलेटमध्ये रूपांतरण करण्यात आले असून प्रत्येक बसच्या पुढील भागात महिलांकरिता व मागील भागात पुरूषांकरीता स्वच्छतागृह व्यवस्था आहे. पुरूष व महिलांसाठी प्रवेशाकरिता दोन्ही बाजूस स्वतंत्र दरवाजे आहेत. आतील भागात महिलांसाठी तीन शौचकूपांची तसेच पुरूषांसाठी 2 शौचकुपांची व्यवस्था आहे व पुरूषांच्या भागात 2 मुतारी व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे. याशिवाय 2 वॉश बेसीन असून महिलांच्या व पुरूषांच्या भागात स्वतंत्र चेंजींग रूम देखील आहेत. या बसेसच्या टपावर पाण्याची टाकी बसविण्यात आलेली असून सर्व गोष्टींचा विचार करून ही मोबाईल टॉयलेट नवी मुंबईकरांच्या सेवेसाठी सज्ज झालेली आहे. 

Two mobile toilet buses in the service of Navi Mumbaikars

-----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.