मुंबईत ओमिक्रॉनचे दोन नवे रूग्ण; राज्यातील रूग्णसंख्या 10 वर

या दोन्ही रुग्णांनी फायझर लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत.
ओमिक्रॉन टेस्टिंगची राज्यात यंत्रणाच नाही!
ओमिक्रॉन टेस्टिंगची राज्यात यंत्रणाच नाही!esakal
Updated on

मुंबई : डोंबिवली आणि पुण्यानंतर आता मुंबईत ओमिक्रॉन व्हेरियंटचे (omicron Patient ) दोन रूग्ण आढळून आले आहेत. विदेशातून आलेल्या दोन जणांना ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झाली आहे. त्यामुळे राज्यातील ओमिक्रॉन रुग्णांची संख्या दहावर पोहचली आहे.

ओमिक्रॉन टेस्टिंगची राज्यात यंत्रणाच नाही!
ओमिक्रॉन हवेद्वारे दोन खोल्यांमध्ये पसरू शकतो, अभ्यासातून समोर आली माहिती

मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण अफ्रिकेतील (South Africa) जोहांसबर्ग येथून 25 नोव्हेंबर रोजी मुंबईत आलेल्या 37 वर्षीय पुरुषाला ओमिक्रॉन विषाणूची बाधा झाल्याचे सिध्द झाले आहे. या रुग्णासोबत राहिलेल्या आणि 25 नोव्हेंबरला अमेरिकेहून (America) आलेल्या त्याच्या 36 वर्षीय मैत्रिणीलादेखील या विषाणूची बाधा झाल्याचे प्रयोगशाळा अहवालातून समोर आले आहे.

बाधित झालेल्या दोन्ही रूग्णांना कोणतीही लक्षणे नसून दोघांनाही सेव्हन हिल्स रुग्णालयात भरती करण्यात आले आहेत. दरम्यान, या दोन्ही रुग्णांनी फायझर लसीचे (Pfizer Vaccine) दोन्ही डोस घेतलेले आहेत. दोन्ही रुग्णांच्या 5 अतिजोखमीच्या आणि 315 कमी जोखमीच्या निकटवर्तीयांचा शोध लावण्यात प्रशासनाला यश आले आहे.

विषाणूमध्ये बदल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून या बाबत जनतेने भीती न बाळगता आपल्या नेहमीच्या व्यवहारात कोविड अनुरुप वर्तनाचा अंगिकार करावा, नागरिकांनी आपले लसीकरण पूर्ण करावे आणि मागील महिनाभरात जे प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करून भारतात आले आहेत त्यांनीही आपल्या बाबत स्थानिक आरोग्य विभागास अवगत करावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने सर्व जनतेला करण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवडमधील एकाच कुटुंबातील सहा रुग्णांना ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झाली आहे. 24 नोव्हेंबर रोजी नायजेरियातून आलेल्या 44 वर्षीय महिलेला, तिच्यासोबत आलेल्य दोन मुलींना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. त्याशिवाय त्या महिलेचा भाऊ आणि त्याच्या दोन्ही मुलींनाही ओमायक्रॉनची लागण झाली आहे. सर्वांना कोरोनाची सौम्य लक्षणे असून पिंपरी-चिंचवडमधील जिजामाता रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. ओमायक्रॉन व्हेरियंटच्या सहा रुग्णापैकी तीन जण 18 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत.

पुण्यातील व्यक्तीला ओमायक्रॉन
पुण्यातील 47 वर्षीय व्यक्तीलाही ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण झाली आहे. ही व्यक्ती काही दिवसांपूर्वी फिनलँड येथे गेली होती. 29 तारखेला त्या व्यक्तीला ताप आल्यानंतर त्याने कोरोना चाचणी केली असता त्यात तो पॉझिटिव्ह आढळून आला. दरम्यान, या व्यक्तीने कोविशिल्ड लस घेतलेली आहे. सध्या या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा त्रास नसून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.