मुंबई: चुकीच्या इंजेक्शनमुळं दोन वर्षांच्या बालकाचा मृत्यू; चार जणांवर गुन्हा

 doctor
doctor sakal
Updated on

मुंबई : गोवंडी येथील नूर रुग्णालय (Noor hospital) प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळं एका दोन वर्षीय बालकाला मृत्यू (child death) झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडलीय. ताहा खान असं मृताचं नाव आहे. लूज मोशनच्या आजारावर उपचार करण्यासाठी लहान मुलाला ८ जानेवारीला रुग्णालायत दाखल करण्यात आले होते. मात्र, एका सफाई कामगाराने त्या मुलाला चुकीचा इंजेक्शन (Wrong injection) दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याच्या घटनेमुळं खळबळ माजलीय. याप्रकरणी पोलिसांनी रुग्णालयात काम करणाऱ्या चार जणांवर गुन्हा दाखल (Police complaint filed) केलाय. रुग्णालयाचे मालक नसुरुद्दीन सय्यद (६३) डॉ. अल्ताफ खान, परिचारीका सलीमुन्नीसा खान (२१) आणि सफाई कामगार नर्गिस अशी आरोपींची नावे आहेत. असं वृत्त इंडिया टुडेनं दिलं आहे. (two year child death due to wrong injection in noor hospital mumbai Four culprit book)

 doctor
महामारीचा अंत जवळ आलाय, लॅन्सेटच्या अहवालातून समोर आली माहिती

सविस्तर वृत्त असं की, रुग्णालयात लहान मुलाला ज्या वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं होत, त्याच वार्डमध्ये मलेरिया रुग्णावर उपचार सुरु होते. या मलेरिया झालेल्या रुग्णाला देण्यात येणारा इंजेक्शन लूज मोशन व्याधीने ग्रस्त असलेल्या बालकाला दिला गेला. त्यामुळे त्या बालकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींवर आयपीसीच्या सेक्शन ३०४-ए अंतर्गत गुन्हा दाखल केला.

बालकाचा मृत्यू झाल्याची घटना पालकांना समजताच रागाच्या भरात त्यांनी रुग्णालयात तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी मृत बालकाच्या कुटुंबियांनी रुग्णालय प्रशासानाविरोधात बुधवारी तक्रार दाखल केली. त्यानंतर आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील चौकशी सुरु आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()