Mumbai News : ठाकुर्ली दिशेकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी नावापुरतीच; वाहनांचा यु टर्न प्रवास सुरुच

वाहतूक विभाग कर्मचाऱ्यांनी एक दिवस येथे नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई करत दंड वसुली करत तिजोरीत भर पाडली
U-turn entry ban for vehicles at thakurli flyover traffic police mumbai
U-turn entry ban for vehicles at thakurli flyover traffic police mumbai Sakal
Updated on

डोंबिवली - ठाकुर्ली उड्डाणपूलाजवळील यू टर्न हा अपघातास निमंत्रण देत असल्याने वाहतूक विभागाकडून या ठिकाणी वळण घेऊन ठाकुर्ली दिशेकडे जाणाऱ्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. ही प्रवेश बंदी केवळ नावाला असल्याचे चित्र आहे.

प्रवेश बंदीसाठी लावण्यात आलेले बॅरीकेट्स वाहनचालकांनी बाजूला करुन ठेवले असून येथून वाहने सर्रास यू टर्न मारुन प्रवास करत आहेत. वाहतूक विभाग कर्मचाऱ्यांनी एक दिवस येथे नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई करत दंड वसुली करत तिजोरीत भर पाडली. परंतू नंतर ना वाहतूक विभागाचे येथे लक्ष आहे ना काही. यामुळे नियम केले तरी जातात कशाला असा सवाल सामान्य नागरिक करत आहेत.

डोंबिवली पश्चिमेतून ठाकुर्ली उड्डाण पुलावरुन येणारी व स.वा.जोशी शाळेमार्गे येऊन ठाकुर्ली चोळेगाव मार्गे येणारी जाणारी वाहने ही उड्डाणपूल जवळ यू टर्न मारत उड्डाणपूल खालील रस्त्याचा वापर करत चोळेगाव मार्गे प्रवास करतात.

U-turn entry ban for vehicles at thakurli flyover traffic police mumbai
Mumbai News : मध्य रेल्वेचा हार्बर मार्ग कचऱ्यात

उड्डाणपूलाच्या तोंडाशी असलेला हा यु टर्नचा रस्ता अरुंद असल्याने वाहन कोंडी तसेच अपघात देखील घडत आहेत. त्यामुळे अनेकदा वाहनचालकांमध्ये वादावादीचे प्रसंग उद्भवत आहेत. याविषयी दै. सकाळ ने वारंवार या प्रश्नांना वाचा फोडली आहे. वाहतूक विभागाने यावर उपाययोजना म्हणून जून महिन्यात ठाकुर्लीकडे जाणाऱ्या चालकांना पुलाजवळील वळण मार्ग बंद केला.

मात्र एक दिवस देखील वाहन चालकांनी या नियमांचे पालन केलेले नाही. येथे लावण्यात आलेले बॅरीकेट्स हे वाहन चालकांनी बाजूला करुन ठेवले असून येथून सर्रास यू टर्न मारुन वाहतूक सुरु आहे. काही दिवसांपूर्वी येथे वाहतूक विभागाने अचानक धाड टाकून एक लेन बंद करुन दोन ते तीन ठिकाणी वाहतूक विभाग कर्मचारी, वॉर्डन उभे राहून नियम मोडणाऱ्या चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली. काही तासांची ही कारवाई करत नंतर वाहतूक कर्मचारी निघून गेले आणि वाहनांची वाहतूक पुन्हा जैसे थे झाली.

U-turn entry ban for vehicles at thakurli flyover traffic police mumbai
Mumbai News : १२५ गिरणी कामगारांना मिळणार हक्काच घर; २९ ऑगस्ट रोजी गृहनिर्माण मंत्र्याच्या हस्ते चावी वाटप

या कारवाई मुळे एक दिवसासाठी काही तासांची ही कारवाई कशाला केली गेली. केवळ दंडात्मक कारवाई करुन तिजोरीत भर पाडून नंतर कर्मचारी येथून निघून गेले. त्यानंतर पुन्हा येथे काही वाहतूक विभागाची कारवाई केली गेली नाही. वाहतूक विभाग नियम बनवतेच कशाला, सामान्य नागरिकांच्या समस्या किंवा शहरातील वाहतूक समस्येविषयी त्यांना खरेच आस्था आहे का ? असा सवाल सामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.

वाहतूक विभाग केवळ नियम करुन दंडात्मक वसुली करतात. वाहन कोंडी सोडविणे हे वॉर्डनचे काम असून वाहतूक कर्मचाऱ्यांच्या सोबतीने वॉर्डन वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करताना दिसतात.

वॉर्डनची कामे दंडात्मक कारवाईची नाहीत. पण कल्याण डोंबिवलीत तुम्हाला उलटेच चित्र दिसून येईल. अनेकदा तर वाहतूक कर्मचारी, वॉर्डन यांना देखील नीट नियम माहीत नसतात. केवळ कोठे कारवाई करुन आपल टार्गेट पूर्ण करता येईल हे पाहतात व कारवाई करतात.

- प्रसन्न गावकर, नागरिक

वाहतूक नियम हे कागदावर असतात त्यांची अंमलबजावणी कोठे ही होत नाही. ठाकुर्ली उड्डाणपूलाजवळ केवळ प्रवेश बंद असा फलक दिसतो. परंतू तो आता आहे की नाही हे वाहन चालकांना माहित नाही. ना या वाहनांना कोठून बंदी आहे त्यांनी कोणत्या पर्यायी मार्गाने जायचे हे माहित. येथे फलक लावणे, कोणत्या कालावधीसाठी हे बदल आहेत ही माहिती देणे आवश्यक आहे. पण वाहतूक विभाग केवळ दिखावा नियम व कारवाई करतात, सामान्य जनतेचे त्यांना पडलेले नाही.

- नितेश निकम, नागरिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()