मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सध्या मुंबईच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या माजी महापौर शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. भाजप स्थानिक पक्षांना संपवण्याचं काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच शिवसेनापक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाची मुंबईत प्रेमाची दहशत आहे, असंही त्या म्हणाल्या. (Uddhav Balasaheb Thackeray fear of love in Mumbai says Kishori Pednekar)
पेडणेकर म्हणाल्या, एकनाथ शिंदेसोबतच्या आमदारांमध्ये एकवाक्यता नाही. त्यांच्यामध्ये एक विचारात दिसत नाही. फक्त शिवसेनेला एकटं पाडायचं आहे. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे या वाक्याची दहशत आहे. ही प्रेमाची दहशत आहे मुंबईत, हे त्यांना उमगतच नाहीए.
बीएमसीसाठी भाजपच्या आधी आम्ही टार्गेट दिलंय
मुंबई महापालिकेसाठी आम्ही दोन दिवस आधी गणपतीच्या तिसऱ्या दिवशी टार्गेट दिलं आहे, मिशन १५०. आमचं हेच मिशन आता भाजप पुढे नेत असेल तर नेऊ दे. ते कुठे स्वबळावर आणणार आहेत, ते पण कोणाच्यातरी खांद्यावर उभे आहेत.
राज्यपालांवर केली टीका
या महाराष्ट्रातील राज्यपाल कसे कसे बदलत गेले याच्या आधीचे राज्यपाल आणि आत्ताचे राज्यपाल कोशियार की होशियार हेच कळलेलं नाही. त्यामुळं हेशियार सीआर (कोटी रुपये) हे चाललंय. त्यामुळं महाविकास आघाडीनं विधानपरिषदेसाठी दिलेली यादी राज्यपालांनी आत्ता बदलली तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.