मुंबई- मराठा आरक्षणावरुन राज्यातील वातावरण तापलंय. त्यातच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सिल्व्हर ओकवर दाखल झाले आहेत. भेटीमागचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. पण, या नेत्यांमध्ये इंडिया आघाडीबाबत चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (silver oak meeting with ncp Sharad Pawar)
बुधवारी इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची बैठक दिल्लीमध्ये शरद पवारांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली आहे. आघाडीतील सर्व सदस्य या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. जागावाटपाचे सूत्र काय असावे याबाबत दिल्लीतील बैठकीत खलबतं होण्याची शक्यता आहेत. त्यामुळे याच संदर्भात ही बैठक आयोजित केली असल्याची शक्यता आहे.
शरद पवार आज दिल्लीला जाणार आहेत. त्यानंतर बुधवारी संजय राऊत दिल्लीत जातील. राऊत यांचाही समावेश आघाडीच्या समन्वय समितीमध्ये आहेत. इंडिया आघाडीच्या समन्वय समितीमध्ये एकूण १४ सदस्य आहेत. देशभरातील नेते या समितीमध्ये आहेत. दिल्लीतील बैठकीमध्ये पुढील वाटचालीबाबत आणि जागा वाटपाच्या सूत्रांबाबत चर्चा होणार आहे.
देशामध्ये मुदतपूर्व निवडणुका लागण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने इंडिया आघाडी रणनीती ठरवणार आहे. इंडिया विरुद्ध भारत आणि सनातन धर्म या दोन मुद्द्यावरुन आघाडी आणि भाजप सरकारमध्ये वाद-विवाद सुरु झाले आहेत. या प्रश्नांवर जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी नीती ठरवली जाण्याती शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्यात मराठा समाजाचे आंदोलन तीव्र झाले आहे. मनोज जरांगे-पाटील गेल्या १५ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. ते सरसकट या शब्दांवर ठाम असल्याने कोंडी झाली आहे. पण, सरकारने यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. जरांगे पाटील आज दुपारी २ वाजता आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. यासंदर्भातही शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा होई शकते. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.