Uddhav Thackeray: "दर आठवड्याला एक माणूस फोडा..."; उद्धव ठाकरेंचं शिंदे अन् भाजपला आवाहन!

कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी जाणाऱ्या कार्यकर्त्यांना कायमचा 'जय महाराष्ट्र' ही केला.
Uddhav Thackeray
Uddhav Thackerayesakal
Updated on

मुंबई : उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकेक जण शिंदेंसोबत जात असल्याचं चित्र आहे. यापार्श्वभूमीवर ठाकरेंनी आज मातोश्रीवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना एकनाथ शिंदे आणि भाजपवर निशाणा साधला. "शिंदे आणि भाजपला सांगतो, दर आठवड्याला एक माणूस फोडा, बिनकामाची माणसं जाऊ द्या" अशा शब्दांत त्यांनी आवाहन केलं आहे. (Uddhav Thackeray appeal to Eknath Shinde and BJP over Thackeray group worker exits enters ShivSena)

Uddhav Thackeray
Sambhaji Bhide Controversy : "गांधीजींसारखा दुसरा होणे नाही"; भिडेंवर राज ठाकरेंचा अप्रत्यक्ष निशाणा?; मनसेनं शेअर केली पोस्ट

सेनेचा पराभव होणार पण...

सायन मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी मातोश्रीवर संवाद साधताना ठाकरे म्हणाले, "मला एका गोष्टीचा अभिमान आहे की, २००७च्या निवडणुकीत असं वातावरण होतं की शिवसेनेचं काय होणार? पण आपण विजय मिळवला. काही महिलांना त्यावेळी आनंदानं अश्रू आवरत नव्हते. त्यांच्या अश्रूचं मोल ज्यांना कळतं ना तोच निष्ठावान आहे"

Uddhav Thackeray
Ramdas Athawale:"नितीश कुमार पुन्हा पलटी मारणार ? NDA मध्ये करणार कमबॅक' रामदास आठवलेंचा मोठा दावा

दर आठवड्याला माणसं फोडा

"तुम्ही ज्यांना मोठं केलं त्यांना अजीर्ण झालं आणि ते निघून गेले. तरी देखील आपलं शिवभोजन आहे. पण जे गोड बोलून दुसऱ्या पक्षात जातात ते काही आपल्याला संपवू शकत नाही. दुसरी गोष्ट अशी की शिंदेंना आणि भाजपला सांगतो की खरंच तुम्ही असंच दर आठवड्याला माझा एकेक माणूस फोडत राहा, कारण बिनकामाची माणसं तुम्ही घ्या. पण त्यांना घेतल्यानंतर थोडीशी शिथिलता आलेले माझे शिवसैनिक पेटून उठतील," अशा शब्दांत त्यांनी शिंदे आणि भाजपवर निशाणा साधला.

Uddhav Thackeray
Taali Teaser: गाली से ताली तक.. सुष्मिता सेन पडद्यावर साकारणार तृतीयपंथीयांचा संघर्ष

प्रामाणिकपणाला सलाम

मी तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही हे असंच काम करता आहात म्हणून जे गेलेत त्यांचं सुख त्यांना लखलाभो माझं सुख तुमच्या साथीसोबतीमध्ये आहे. तुमच्या प्रामाणिकपणाला मी सलाम करतो, अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.