Shivsena : इकडे ठाकरे दसरा मेळाव्यासाठी न्यायालयात; तिकडे शिंदे गट राज्य पिंजून काढणार

महाराष्ट्रातील जनतेच्या भावनांची दखल दसरा मेळाव्याच्या भाषणात मुख्यमंत्री घेणार अशी शक्यताही वर्तवली जाते आहे.
Uddhav Thackeray Eknath Shinde taking over Shiv Sena party politics thane
Uddhav Thackeray Eknath Shinde taking over Shiv Sena party politics thaneSakal
Updated on

जनप्रतिसादाचे सोने आपल्याच वाट्याला यावे यासाठी उध्दव ठाकरे गट कामाला लागला असतानाच ,सीमोल्लंघन यशस्वी व्हावे यासाठी जनतेशी संवाद साधण्यास शिंदे गटातले मंत्री राज्य पिंजून काढणार आहेत. आज शिवाजीपार्कमध्ये दसरा मेळाव्याची परवानगी मागण्यासाठी ठाकरे सेनेने न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

Uddhav Thackeray Eknath Shinde taking over Shiv Sena party politics thane
Dasara Melava Shivsena: ठरलं? शिंदे गटाचा अर्ज BMC ने स्विकारला तर शिवसेनेचा फेटाळला!

१९६६ पासून एक मैदान एक दिवस आणि एक घराणे असे या मेळाव्याचे स्वरुप राहिले असून शिवाजीपार्कवर मेळाव्याला परवानगी देताना ती मूळ शिवसेनेलाच दिली गेली होती.आमचाच अर्ज पहिला असून सालाबादाप्रमाणे महापालिकेने परवानगी द्यावी असे या याचिकेत नमूद करण्यात आले आहे. खरा पक्ष कोणाचा या संबंधीची याचिका प्रलंबित असली तरी मूळ घराण्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सेनेलाच मेळाव्याचा हक्क आहे असे प्रतिपादन केले जाईल.ठाकरे घराण्याप्रती असलेली सहानुभूती या निमित्ताने सक्रीय व्हावी हा याचिकेचा हेतू असल्याचे सांगितले जाते आहे.

Uddhav Thackeray Eknath Shinde taking over Shiv Sena party politics thane
Uddhav Thackeray : दसरा मेळाव्यात ठाकरे परिवार हुकुमाचा एक्का बाहेर काढणार? नव्या पोस्टरची चर्चा

शिंदे गटाने एमएमआरडीए मैदानावर मेळाव्याची जय्यत तयारी सुरु केली आहे. तसेच मेळाव्याच्या आधी जनतेच्या दरबारात जाण्याचे राज्यव्यापी संपर्क अभियानही हाती घेतले आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेचे मंत्री घटस्थापनेपासून २६ सप्टेंबरपासून महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात मुक्कामी दौरे करणार आहेत. जनतेला कोणत्या अडचणी भेडसावत असून गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्रातले सरकार संवेदनशीलपणे वागले नसले तरी ते दिवस गेले आहेत असे जनतेला सांगणे हा या संपर्क दौऱ्याचा उद्देश आहे. जनतेची गाऱ्हाणी, मागण्या ,दु:खे तसेच संवेदना ऐकून घेऊन त्याबद्दलची माहिती प्रत्येक मंत्री एकत्रितपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देणार आहे.

शिंदे गटातील प्रत्येक मंत्र्याला चार जिल्ह्यांचा दौरा करायचा आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर रत्नागिरी ,सिंधुदुर्ग ,सांगली आणि कोल्हापूर या चार जिल्ह्यांचा दौरा करतील तर संजय राठोड यांनी विदर्भातील , दादा भुसे यांनी उत्तर महाराष्ट्रातील गावांचा दौरा करायचा आहे. निश्चित झालेल्या जिल्ह्यांचा चार दिवसात दौरा करुन तेथील परिस्थिती मुख्यमंत्री शिंदे यांना सविस्तरपणे कथन केली जाईल. महाराष्ट्रातील जनतेच्या भावनांची दखल दसरा मेळाव्याच्या भाषणात मुख्यमंत्री घेणार अशी शक्यताही वर्तवली जाते आहे.दसरा हा शिवसेनेच्या वाटचालीतला महत्वाचा भाग आहे. त्या आधी जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करुन वातावरणनिर्मितीचा प्रयत्न शिंदे गटातर्फे केला जातो आहे.

दरम्यान उध्दव ठाकरे आज कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून ते महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार असल्याची चर्चा आहे. न्यायालयात सुरु असलेली लढाई स्थानिक निवडणुका जवळ येत असल्याने जनतेच्या न्यायालयातही लढली जाणार आहे. आता जनतेच्या न्यायालयात विजय कोणाचा अन् खरे कोण याचा फैसला होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.