Uddhav Thackeray Dasara Melava: राज्य माता गाय झालीये... आर्यन खानचं नाव घेत गोरक्षकांवर भडकले उद्धव ठाकरे

शीवतीर्थावर शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी शिंदेंच्या शिवेसेनेसह भाजपवर सडकून टीका केली.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeraysakal
Updated on

Uddhav Thackeray Dasara Melava: शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. गायीला राज्यमातेचा दर्जा दिल्यावरुन ठाकरेंनी शिंदेंवर जोरदार टीका केली. तसंच गोरक्षकांवरही ते बरसले.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Dasara Melava: सरकार आल्यास प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदीर बांधणार; उद्धव ठाकरेंची घोषणा

राज्य माता गाय झाली आहे. मराठी अभिजात भाषा झाली पण भाषेची काय स्थिती आहे. गाय आता माता झाली तर तिचा हंबरडा काय राज्य भाषा होणार आहे का? पण महिलांवरच्या अत्याचाराचे हंबरडे तुम्हाला ऐकू येत नाही का? आधी आईची रक्षा करा मग गाईला माता बनवा. हरियाणात एकाला गोमांस तस्करी प्रकरणी मारलं, त्याचं नाव आर्यन शर्मा होतं. त्याची बातमी कुठे आली नाही.

पण आर्यन खान नाव असतं तर हिंदुत्व खतरे मे असं म्हणाले असते. किरण रिजूजू मी गोमांस खातो ‌म्हणतात. मग मोदी त्यांच्यावर कारवाई करणार का?, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी सरकारवर आणि कथित गोरक्षकांवर सडकून टीका केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.