Mumbai : नीलम गोर्हेंसह त्या तिघांवर अपात्रतेची कारवाई

शिवसेना उध्दव ठाकरे गटाची व्यूहरचना,नीलमताईंविरोधातील अविश्वास ठराव मागे घेण्याचा प्रस्ताव भाजपनेते प्रवीण दरेकर यांनी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत मांडला होता.
नीलम गोऱ्हे
नीलम गोऱ्हे sakal
Updated on

मुंबई : विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोर्हे ,प्रा.मनीषा कायंदे आणि विप्लव बजोरिया हे तिघे शिंदे गटाकडे गेले आहेत.त्यांचे हे पक्षांतर बंदी कायद्यात बसत नसल्याने त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करा अशी भूमिका शिवसेना उध्दव ठाकरे गटातर्फे घेतली जाणार आहे.

विश्वसनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या तिघांना अपात्र घोषित करा अशी मागणी करतानाच अपात्रतेची कारवाई सुरु असताना नीलमताईंना पीठासीन अधिकार्याचे काम करण्यास मज्जाव करा असा आक्रमक पवित्राही शिवसेनेचा ठाकरे गट घेणार आहे.नीलमताईंविरोधातील अविश्वास ठराव मागे घेण्याचा प्रस्ताव भाजपनेते प्रवीण दरेकर यांनी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत मांडला होता.

नीलम गोऱ्हे
Mumbai : मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील उपाययोजनेचा बोजवारा; जानेवारी ते जून दरम्यान एकूण ७० अपघातामध्ये ३७ मृत्यू

तो कामकाज सुरु झाल्यानंतर परिषदेत मांडावा लागेल.प्रस्ताव मागे घेण्यास ठाकरे गट विरोध करणार असून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार या बाबत त्यांना पाठिंबा देतील.परिषदेत ठाकरे गटाचे ८ ,कॉंग्रेसचे ९ ,शरद पवार गटाचे ४ तर अपक्ष ३ आणि लोकभारतीचे २ आमदार आहेत.

आता परिषदेत भाजपचे २२ सदस्य असल्याने त्यांना बहुमत मिळाले आहे.त्यामुळे नीलम गोर्हे यांना अडचणीत आणणे ठाकरे गटाला संख्याबळाच्या आधारावर शक्य नाही.मात्र अपात्रतेची कारवाई हे प्रभावी अस्त्र ठरू शकेल असा अंदाज आहे.

नीलम गोऱ्हे
Mumbai : सुट्टी न मिळाल्याने तरुणीने डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये लावली आग

सभापती कोण ?

परिषदेत कायम हुलाकवणी देणारे बहुमत आता सत्ताधार्यांच्या बाजुने झाले आहे.राज्यपालनियुक्त १२ सदस्यांच्या जागा रिक्त असल्या तरी सत्ताधार्यांकडे बहुमत आहे. या परिस्थितीत भाजप राम शिंदे या तरुण नेत्याला सभापती करणार की हा मान अजितदादा गटात गेलेले जुनेजाणते नेते माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना मिळणार अशी चर्चा सुरु आहे.राष्ट्रवादी कॉंग्रेसला या पदाबद्दल आश्वासन दिले आहे काय याची उत्सुकता भाजपमध्येही आहे.

नीलम गोऱ्हे
Mumbai : आखाडीचा दणका ! गटारीनिमित्त चिकण, मटणाच्या दरात वाढ

दानवेच विरोधी नेते ?

दरम्यान विरोधी बाकांवर कॉंग्रेसची सदस्यसंख्या सर्वाधिक असली तरी महाविकास आघाडीत सत्तासमतोल रहावा यासाठी अंबादास दानवेंच्या पदावर टाच आणली जाणार नाही असे समजते.उध्दव ठाकरे यांचे मल्लिकार्जुन खरगे ,राहुल गांधी यांच्याशी असलेले संबंध उत्तम आहेत ,त्यांच्याकडील पद काढून घेवू नये असा कॉंग्रेसमध्ये मतप्रवाह आहे.

इच्छुकांची मोर्चेबांधणी हा देखील कॉंग्रेसचा अंतर्गत ताप आहे.अभिजित वंजारी या विदर्भातील नेत्याने या पदावर हक्क सांगणारे पत्र श्रेष्ठींना पाठवले असून सतेज पाटील हे शक्तीशाली नेते सध्या कॉंग्रेसचे परिषदेतील पक्षनेते आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()