Thane News : उबाठा गटाच्या खासदार चतुर्वेदींच्या विरोधात आंदोलन

शिंदे सेना ठाणे जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा तथा माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली टेंभीनाका येथील आनंद आश्रमाबाहेर वरील हे आंदोलन शुक्रवारी करण्यात आले.
mp priyanka chaturvedi
mp priyanka chaturvedisakal
Updated on

ठाणे - कल्याणचे विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या उबाठा गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्याविरोधात ठाण्यात शिंदे गटाच्या संतप्त महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले. यावेळी चतुर्वेदी यांचा बॅनर तयार करून त्यांच्या छ्याचित्रासह त्यांचा दावोसची गुलाबो.. असा उल्लेख करून तो बॅनर पायदळी तुडविण्यात आला.

शिंदे सेना ठाणे जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा तथा माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली टेंभीनाका येथील आनंद आश्रमाबाहेर वरील हे आंदोलन शुक्रवारी करण्यात आले. यावेळी संतप्त महिला आघाडीने चतुर्वेदी यांच्याविरोधात घोषणाबाजी करत, त्यांचा दावोसची गुलाबो.. असे उल्लेख केला. याप्रसंगी मोठया संख्येने महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना, मीनाक्षी शिंदे यांनी खासदारांना किमान वडील आहेत. पण, तुझे किती बाबा झाले हे आता तुला सांगण्याची वेळ आली आहे. अनेक पक्ष बदलून निष्ठेची वार्ता करण्यासाठी असे कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांच्याकडे आहेत. हेच त्यांचे दुभाग्य आहे.

तसेच उबाठाकडे लोकसभा किंवा आगामी निवडणुकीसाठी व्हिजन नाही, विकासाची कामे नाही. त्यामुळे ते वैफल्यग्रस्त झाले आहे. त्यामुळे भाड्याने अशाप्रकारे आणलेल्या माणसांकडून ते वक्तव्य करतात असे त्या म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.