Uddhav Thackeray: कल्याण ग्रामीण मधून मी देखील प्रबळ दावेदार; रोहिदास मुंडे यांची मातोश्री कडे मागणी!

Kalyan Latest Update: मी देखील तेवढाच येथील दावेदार असून जबाबदारी दिल्यास मी तेवढ्याच ताकदीने निवडणूक लढवेल असे मुंडे यांनी सांगितले.
 Uddhav Thackeray: कल्याण ग्रामीण मधून मी देखील प्रबळ दावेदार; रोहिदास मुंडे यांची मातोश्री कडे मागणी!
Updated on

Mumbai Latest News: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण ग्रामीणचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुभाष भोईर यांचे नाव आघाडीवर असतानाच आता दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी देखील कल्याण ग्रामीणमधून भोईरांसोबत आपण ही उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार असल्याचा दावा केला आहे. मातोश्रीकडे त्यांनी उमेदवारी मिळण्याविषयी मागणी देखील केली आहे. यामुळे आता पक्ष प्रमुख कल्याण ग्रामीण मधून कोणाला उमेदवारी देतात हे पहावे लागेल.

विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून येत्या काळात जागा निश्चिती होऊन उमेदवारांची यादी जाहीर केली जाऊ शकते. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात मनसेचे राजू पाटील हे आमदार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.