Uddhav Thackeray: हिंदुत्वाचा आधार घेऊन हिंदुंच्या विरोधात तानाशाही आणण्याचा प्रयत्न; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

केंद्रात आपली सत्ता येणार आहे. आमचं हिंदुत्व हे आमचं राष्ट्रीयत्व आहे. केंद्रात सरकार येणार आणि तुम्हाला ते आणावं लागणार, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
Uddhav Thackeray: हिंदुत्वाचा आधार घेऊन हिंदुंच्या विरोधात तानाशाही आणण्याचा प्रयत्न; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
Updated on

Uddhav Thackeray: मीरा भाईंदर येथे गोवर्धन पूजा कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी आज संबोधित केले. यादव सेवा संस्थेने हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला. तसेच एकनाथ शिंदे यांच्यावर देखील टीका केली. 

कालपर्यंत जो आपल्या घरात राहीला, ज्याला आपलं समजलं तो आज विरोधात उभा आहे. तो शत्रू बनून उभा आहे. हे राजकारण आहे. इथं मला भगवान कुष्णाची, महाभारताची आठवण येते. अर्जून म्हणाला, सर्व माझे लोक आहेत. मी कसा धनुष्यबाण कसा उचलू, मात्र कुष्णाने सांगितले जो धर्माच्या विरोधात गेला तर लढावेच लागेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

भारत आणि महाराष्ट्रातील जनतेत श्री कृष्णाचे रुप आहे. ही राजकीय सभा नाही. मी मीरा भाईंदरमध्ये सभेत येईन. उत्तर भारतीय आणि मराठी माणूस दूध आणि साखरेसारखा आहे. यात मीठ कोण घालतयं याकडे लक्ष द्यावं लागेल, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

उद्धव ठाकरे म्हणाले, अयोध्येत राम मंदिर उभारंल जात आहे, ही गौरवाची गोष्ट आहे. मला १९९२, ९३ च्या गोष्टी आठवत आहे. त्यावेळी शिवसेनेने मुंबईतील हिंदूना वाचवलं. तेव्हा मी हिंदू आहे सांगायाला लोक भीत होते. भाजपची गोष्ट सोडून द्या, मुंबई जळत होती तेव्हा फक्त बाळासाहेब ठाकरे उभे होते. शिवसेना ही धर्माची रक्षा करणारी आहे.

Uddhav Thackeray: हिंदुत्वाचा आधार घेऊन हिंदुंच्या विरोधात तानाशाही आणण्याचा प्रयत्न; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
Corona Update: राज्यात JN.1 व्हेरियंटचे 10 रुग्ण; ठाणे, पुणे अन् अकोल्यात नव्या रुग्णांची नोंद

केंद्रात आपली सत्ता येणार आहे. आमचं हिंदुत्व हे आमचं राष्ट्रीयत्व आहे. केंद्रात सरकार येणार आणि तुम्हाला ते आणावं लागणार, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

फ्रि दर्शन द्यायला रामलल्ला तुमची प्रॉपर्टी आहे का?, असा सवाल देखील उद्धव ठाकरे यांनी भाजपला केला. ह्रदयात राम आणि हातात काम हे आमचं हिंदुत्व आहे. आता हिंदुत्वाचा आधार घेऊन हिंदुंच्या विरोधात तानाशाही आणण्याचा प्रयत्न होत आहे. या तानाशाहीला संपवून टाका, असे उद्धव ठाकरे म्हणाले. 

महाराष्ट्रातील सर्व उद्योग गुजरातला नेण्यात येत आहेत. देशात दुसरे राज्य नाहीत का? आपल्या सोबत असणारे गुजराती परत जाणार का? गुजरात मजबूत झाला तर देश मजबूत होणार, असे मोदी म्हणतात, का? महाराष्ट्र, मध्ये प्रदेश मजबूत झाला तर देश मजबूत होणार नाही का?, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

Uddhav Thackeray: हिंदुत्वाचा आधार घेऊन हिंदुंच्या विरोधात तानाशाही आणण्याचा प्रयत्न; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
Israel–Hamas war : इस्राईलच्या हल्ल्यात एकाच कुटुंबातील ७६ पॅलेस्टिनींचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रसंघाचा इशारा धुडकावला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.