Uddhav Thackeray : बारसू रिफायनरीबाबत उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले...

Uddhav Thackeray, Devendra Fadnavis and Eknath Shinde
Uddhav Thackeray, Devendra Fadnavis and Eknath Shinde
Updated on

मुंबई - मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार अशा चर्चा आहे. त्यातच आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कामगार सेनेच्या कार्यक्रमाला संबोधित केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी बारसू रिफायनरीवरून आपली भूमिका स्पष्ट केली.

Uddhav Thackeray, Devendra Fadnavis and Eknath Shinde
Abdul Sattar : छाती फाडून दाखवली तर विखेच दिसतील; मुख्यमंत्रीपदाच्या प्रश्नावर सत्तारांचं विधान

उद्धव ठाकरे म्हणाले की, कामगारांचे मोर्चे निघतात. मात्र सध्याचं सरकार संवेदनशील राहिलं नाही. त्यामुळे मोर्चे काढून काही होत नाही. देशात ६० टक्के कामगारच संघटीत आहे. आम्ही अनेक उद्योग महाऱाष्ट्रात आणले. पण यांनी सगळे उद्योग पळवल्याची टीका उद्धव यांनी केली.

दरम्यान जोडे बनवणारी कंपनी महाराष्ट्रात येणार असा दावा उद्योगमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केला होता. त्यामुळे दोन हजार कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात येणार असा दावा करण्यात आला होता. मात्र ती कंपनी देखील तामिळनाडूला गेली. जोडे बनवणारी कंपनीही गेली, आता बसले जोडे पुसत अशा शब्दात उद्धव यांनी शिंदे सरकारवर टीका केली.

Uddhav Thackeray, Devendra Fadnavis and Eknath Shinde
Solapur Politics: तेव्हा संजयमामा आता राजाभाऊ, जखमी झालेल्या जिल्हाबँकेने धरलंय बाळसं

मी बारसूच्या जागेचं पत्र दिलं, असा दावा करण्यात येत आहे. उद्धव ठाकरेंचं एवढं ऐकत होता, तर मग गद्दारी करून सरकार का पाडलं? अस. सरकार पाडलं, त्याचा मी बदला घेणार, असा इशारा उद्धव यांनी दिला.

बारसू रिफायनरीबाबत उद्धव ठाकरे म्हणाले की, नाणार आणि बारसूबाबतची माझी जी भूमिका होती ती माझी नव्हे तर जनतेची भूमिका होती. राजापूरच्या एका कार्यक्रमात मला काही स्थानिक लोकांनी नाणारबाबत आंदोलनासाठी पाठिंबा मागितला. त्यामुळे आम्ही नाणारला विरोध केला. त्यावेळी रोजगार मिळेल, शुद्धीकरण रिफायनरी होईलं, असं मला सांगण्यात आलं. त्यानंतर बारसूची जागा समोर आली. त्यामुळे मी बारसूची जागा सुचवली. मात्र बारसूच्या जागेसाठी आता जबरदस्ती होतेय. लोकांच्या भल्याचा प्रकल्प असेल तर जबरदस्ती करण्याची वेळ का येते, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

दरम्यान प्रकल्पाबाबत समज आणि गैरसमज जे असेल ते लोकांसमोर ठेवा. आमच्या सरकारचं हेच धोरण होतं. तेच धोरण तुम्ही राबवा. चांगले प्रकल्प राबविण्यासाठी तुम्हाला लोकांना अटक करण्याची गरज का पडते, असा प्रश्न ठाकरेंनी उपस्थित केला. तसेच लोकांना सांगा, प्रकल्प नेमका काय आहे, त्यांचे समज आणि गैरसमज दूर करा. रोजगाराविषयी सांगा, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी सरकारलं केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.