Uddhav Thackeray: अब्दुल सत्तार अन् सुधीर मुनगंटीवार माफी मागणार का? ; अंबादास दानवेंचा बचाव करतांना उद्धव ठाकरेंचा सवाल

Uddhav Thackeray reaction in marathi: उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निलंबनावर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच भाजपवर खोचक सवाल उपस्थित केले.
Uddhav Thackeray
Uddhav Thackerayesakal
Updated on

विधानपरिषदेत काल सोमवार विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना भाजप आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ केल्यामुळे ५ दिवसांसाठी निलंबित करण्यात आले. या घटनेवर उद्धव ठाकरे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी माफी मागितली, परंतु त्यांनी प्रश्न उपस्थित केला की अब्दुल सत्तार आणि सुधीर मुनगंटीवार हे माफी मागणार का?

उद्धव ठाकरे म्हणाले, "काल जो निकाल जाहीर झाला त्यात पदवीधर आणि शिक्षक आम्ही मवीआ म्हणून लढलो आणि आम्ही यश मिळवले. पदवीधर आणि शिक्षकांचे मी आभार मानतो. नाशिक आणि कोकणात देखील ज्यांनी आशीर्वाद दिले त्यांचे आभार."

एकतर्फी निर्णय: लोकशाहीला मारक-

उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेत घेतलेल्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, "दानवे यांना बाजू मांडायला द्यायला हवं होतं. ठरवून हे षडयंत्र रचून विरोधकांना निलंबित केलं आहे. महाराष्ट्राची जनता डोळे उघडून हे पाहत आहे."

उद्धव ठाकरे म्हणाले, "महिलांचा अपमान झाला असेल तर माफी मागतो. पण अब्दुल सत्तार यांनी दिलेल्या शिव्यांचं काय?" तसेच, त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्यांचा उल्लेख केला आणि विचारले की ते माफी मागणार का?

राहुल गांधी यांचे वक्तव्य आणि हिंदुत्व-

उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांचे वक्तव्य स्पष्ट केले. त्यांनी म्हटले, "राहुल गांधी नेमकं काय बोलले होते? त्यांनी खरंच हिंदूत्वाचा अपमान केला होता का? काल राहुल गांधी म्हणाले भाजप म्हणजे हिंदुत्व नाही. माझं देखील तेच म्हणणं आहे. मी भाजपाला सोडलं आहे, हिंदुत्व नाही."

तिसरा उमेदवार आणि आत्मविश्वास-

उद्धव ठाकरे म्हणाले, "आमच्यात आत्मविश्वास आहे म्हणूनच आम्ही तिसरा उमेदवार दिला. कदाचित त्यांना आता भीती वाटते. त्यांनी अंबादास दानवे यांच्या शब्दाबद्दल माफी मागतो, परंतु सुधीर मुनगंटीवार यांना विचारले की त्यांनी माता भगिनींचा अपमान केल्याबद्दल माफी मागणार का?"

Uddhav Thackeray
Amravati Bus Accident: अमरावती जिल्ह्यात बस दरीत कोसळली! 25 ते 30 प्रवासी असल्याची माहिती, 6 गंभीर जखमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.