Raj Thackeray: राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेतात, ठाकरे गटाने असं का म्हटलं?

Raj Thackeray: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज ठाकरे, एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.
Uddhav Thackeray Shiv Sena MP Sanjay Raut criticizes Raj Thackeray
Uddhav Thackeray Shiv Sena MP Sanjay Raut criticizes Raj Thackeray esakal
Updated on

Raj Thackeray

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली. राज ठाकरे यांनी महायुतीला लोकसभा निवडणुकीत पाठिंबा दिला आहे. तसेच शिवाजी पार्कवर नरेंद्र मोदींच्या सभेत देखील त्यांचे भाषण झाले. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरण बदलले आहेत. एकेकाळी राज ठाकरे मोदी-शहांवर घणाघात करत होते. आता त्यांनी भूमिका बदलल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

दरम्यान राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेतात, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. ईशान्य मुंबईत राज ठाकरे, नारायण राणे हे सगळे आले. यांना आम्ही रस्त्यावर उतरवलं आहे. राज ठाकरे यांनी स्वत:च्या पक्षासाठी इतरी मेहनत घेतली असती. तर कदाचित त्यांच्या कार्यकर्त्यांना चांगले दिवस आले असते. पण भाजपने अनेकांना भाड्याने घेतलं असल्याचे संजय राऊत म्हणाले.

मोदी आणि शहांनी असे काय महान दिवे लावलेत. ज्या मोदी-शहांना महाराष्ट्रात पाय ठेवू देऊ नका, असे आपण सांगत होतात. त्यांच्या पखाल्या वाहता तुम्हाला पाहून आम्हाला वाईट वाटलं, अशी टीका संजय राऊत म्हणाले.

उद्धव ठाकरे पहिल्यांदा पंजाला मतदान करतील तर राज ठाकरे धनुष्यबाणाला मतदान करतील. यावर संजय राऊत म्हणाले, तो खोटा धनुष्यबाण आहे. तो शिवसेनेचा, बाळासाहेबांचा धनुष्यबाण नाही. चोरीचा मालावर ते हक्क सांगत आहेत. राज ठाकरे चोरीच्या मालाचे चुंबन घेत आहेत. ते नकली ओठ आहेत.

Uddhav Thackeray Shiv Sena MP Sanjay Raut criticizes Raj Thackeray
RSS नंतर आता दिग्विजय सिंह यांनी CM योगींचे केले कौतुक मात्र मोदींवर खोचक टीका, नेमकं काय म्हटलं वाचा...

आम्ही पंजावर मतदान करतोय पण हा पंजा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा आहे. काँग्रेसने देशाच्या स्वातंत्रलढ्यात सर्वात जास्त योगदान दिलं आहे. मात्र कमळाबाईने देशाची वाट लावली असून देशाला लुटलं आहे. त्यामुळे देश आणि संविधान वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत.

आम्हाला पराभवाची भीती नागी. महाविकास आघाडीला महाराष्ट्रात ३५ पेक्षा जास्त जागा मिळतील. ज्यांना पराभवाची भीती वाटते ते यंत्रणांचा वापर करतात आणि पौसे वाटताता आमच्याकडे पैसेच नाहीत, असे राऊत म्हणाले.

मुख्यंमत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते. रडीचा डाव सुरु आहे. यावर राऊत म्हणाले, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे चिन्ह चोरणे हा सर्वात मोठा रडीचा डाव आहे. जे रडीच्या डावावर बसून भाजपचे गुलाम बनून काम करतात, त्यांनी अशी भाषा बोलू नये. 

Uddhav Thackeray Shiv Sena MP Sanjay Raut criticizes Raj Thackeray
Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.