Shivsena UBT: शिवसेनेने विधानसभा निवडणुक जिंकण्यासाठी कंबर कसली!

Shivsena: भव्य पदाधिकारी,कार्यकर्ता मेळाव्यात निर्धार,..येश साध्य करण्यासाठी सज्ज व्हा
Shivsena UBT: शिवसेनेने विधानसभा निवडणुक जिंकण्यासाठी कंबर कसली!
Updated on

Ulhasnagar: लोकसभा निवडणुकीत धनशक्ती विरुद्ध जनशक्तीच्या लढाईत महाविकास आघाडीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार यांना विशेषतः निष्ठावंतांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.

त्याअनुषंगाने उल्हासनगरात तीन विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी,कार्यकर्त्यांच्या आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसण्यात आली आहे.

उल्हासनगर,कल्याण आणि अंबरनाथ मधील विधानसभा मतदार संघामधील शेकडोच्या संख्येने उपस्थित पदाधिकारी,कार्यकर्त्यांना उपनेते संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत यांनी मार्गदर्शन केले.

तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख या महत्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आलेले जेष्ठ माजी नगरसेवक धनंजय बोडारे यांनी आता हारायचे नाही तर लढायचं.असा निर्धार करून ध्येय साध्य करण्यासाठी सज्ज व्हा असा संदेश दिला.

Shivsena UBT: शिवसेनेने विधानसभा निवडणुक जिंकण्यासाठी कंबर कसली!
Ulhasnagar MSEB: शॉक लागल्याने महावितरणच्या सिनिअर टेक्निशियनचा मृत्यू!

याप्रसंगी उपनेते,संपर्क प्रमुख गुरुनाथ खोत,जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे,पदाधिकारी हर्षवर्धन पालांडे,शरद पाटील,भाऊ म्हात्रे,राजेंद्र शाहू,राजेश वानखेडे,कैलास तेजी,रवींद्रसिंग भुल्लर,वैशाली दरेकर,अंजली राऊत,वसुधा बोडारे,शेखर यादव,अभिजीत सावंत,डॅा.जानु मानकर,प्रभाकर पाटील, प्रकाश चौधरी,कृष्णा पुजारी,पुरुषोत्तम चव्हाण संतोष सावंत,राजेश कणसे,हेमंत केणे,नीरज कुमार,अंकुश भांडे,संदिप पगारे,भावना भारंबे,जया तेजी,मंगला पाटील,दिलीप मिश्रा,राज महाडिक आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Shivsena UBT: शिवसेनेने विधानसभा निवडणुक जिंकण्यासाठी कंबर कसली!
Ulhasnagar Municipal Corporation : उल्हासनगरातील अतिरिक्त आयुक्तांच रिक्त पद 10 महिन्यांनी भरले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.