Uddhav Thackeray: "ठाणे म्हणजे आमची असली शिवसेना"; उद्धव ठाकरेंचं एकनाथ शिंदेंना आव्हान

उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंची तोफ पुन्हा एकदा धडाडली
Eknath Shinde  group Uddhav Thackeray news
Eknath Shinde group Uddhav Thackeray newsesakal
Updated on

मुंबई : ठाणे म्हणजे आमची खरी शिवसेना आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान दिलं आहे. ठाण्यात उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात ठाकरे बोलत होते. गडकरी रंगायतन सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी सभागृहातील गर्दी पाहून आणि इथला जोश पाहून लोकांचे होश उडतील असंही यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले. (Uddhav Thackeray Thane means our real Shiv Sena direct challenge to Eknath Shinde)

ठाकरे म्हणाले, आज हा जोश बघून काही लोकांचा होश उडाले असतील. ठाणे म्हणजे असली शिवसेना. आजकल मार्केटमध्ये चायनीज माल येतो, देवाच्या मूर्त्यापण येत असतील असे काहींचे देवही नकली आहेत. त्यांना वाटतं आपण शिवसेनेपेक्षा मोठे आहोत पण ते मोठे होऊ शकत नाही ते असेच वर जातील. मी आव्हानाला कधी आव्हान मानत नाही संधी मानतो.

परीक्षा तभी होती है जब कठीण समय आता है. जेव्हा लढायची वेळ येते तेव्हा खरे सैनिक सोबत असतात. शिवसेनेनं उत्तर भारतीयांसाठी काय केलं? असं विचारलं जातं पण केलं नसतं तर तुम्ही इथं आलाच नसता. मी कोणाहीसोबत भेदभाव केला नाही हे मी तुम्हाला लिहून देतो. मला जे करायचं होतं ते मी कोरोनाच्या काळात केलं. माझं सौभाग्य आहे की महाराष्ट्राची जनता मला त्यांच्या कुटुंबातील सदस्य मानते.

मी काँग्रेससोबत खुलेआम गेलो, आर्ध्या रात्रीत जाऊन मिटिंग केली नाही. पण त्यांच्यासमोबत जाण्यासाठी आम्हाला मजबूर कोणी केल? शिवसेना-भाजपची युती हा जगातलं फेविकॉलहूनही मजबूत जोड होता. पण मला आजारपणातल्या गळ्याभोवतीच्या पट्ट्यावरुन हिणवलं गेलं. तसे पट्टे बांधणारा कधी पैदा झाला नाही कधी होणार नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.