Dharavi Plan: उद्धव ठाकरेंनी सांगितला धारावीच्या विकासाचा प्लॅन; म्हणाले, धारावीत...

धारावी ते बीकेसी काढलेल्या मोर्चानंतर झालेल्या सभेत बोलताना ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली.
Dharavi Slum
Dharavi SlumSakal
Updated on

मुंबई : अदानी समुहाद्वारे होणाऱ्या धारावीच्या झोपडपट्टीचा पुनर्विकास योजनेला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं विरोध केला आहे. यासाठी धारावी ते बीकेसी काढलेल्या मोर्चानंतर झालेल्या सभेत बोलताना ठाकरेंनी धारावीच्या विकासाच्या प्लॅनबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. (Uddhav Thackeray told Dharavi redevelopment plan to Ekanth Shinde govt and Modi govt)

Dharavi Slum
Dharavi Bachav Morcha: "भाजपच्या जावयाला आंदण देण्यासाठी मुंबई महाराष्ट्रानं मिळवली नाही"; ठाकरेंची सडकून टीका

केसालाही धक्का लागता कामा नये

ठाकरे म्हणाले, आमच्या प्रमुख मागण्या आहेत. घराला घर दिल्याशिवाय धारावीकरांच्या केसाला देखील धक्का लागता कामा नये. जिथल्या तिथं घर पात्र अपात्र आम्ही मानत नाही. व्यवसायाला देखील जागा दिली पाहिजे. कोळीवाड्याची, कुंभारवाड्यांचंही सीमांत करा. इथं पापड-लोणच्याचे व्यवसाय करणाऱ्यांच्या व्यवसायाला आवश्यक असलेली जागाही दिलीच पाहिजे. हे दिलंच पाहिजे त्याशिवाय इथून हालायचचं नाही. (Latest Marathi News)

Dharavi Slum
Dharavi Bachav Morcha: "मातोश्री 2 च्या विकासासाठी धारावीच्या विकासाला विरोध"; भाजपच्या 'या' आरोपाला अंधारेंचं प्रत्युत्तर

मुंबईचं आर्थिक केंद्र हालवल

आज जो माझ्यावर खासकरुन आरोप केला जातो की प्रकल्पाला विरोध केला जातो. मी या प्रकल्पाला विरोध करत नाही. माझं जाहीर मागणी आहे की, जिथल्या तिथं घरं. चावी दिल्याशिवाय घर सोडायचं नाही. मुंबईचं आर्थिक केंद्र हालवायचं. मुंबईला कसं ठेचून टाकायचं, सगळं काही गुजरातला घेऊन जायचं हे सध्या सुरु आहे. यांनी क्रिकेटची फायनल मॅचही गुजरातला नेली याचा फायदाही मुंबईला झाला असता. फॉक्सकॉन प्रकल्प नेला, सगळं नेलं. (Marathi Tajya Batmya)

Dharavi Slum
Dharavi Bachav Morcha: 'धारावी बचाव मोर्चा'कडं धारावीकरांची पाठ? मोर्चाला अद्याप सुरुवात नाही!

धारावीचा सांगितला प्लॅन

विकास करायचाच असेल तर मुंबईसाठी लढलेल्यांना पोलीस कर्मचाऱ्यांना या धारावीत घरं द्या, गिरणी कामगारांना, सफाई कामगारांना, सरकारी कर्मचाऱ्यांना घरं द्या. ज्यांच्यावरती मुंबईचा नव्हे तर महाराष्ट्राचा डोलारा आहे त्यांना घरं द्या. या सर्वाना तर घरं द्याचं आणि गुजरातला नेलेलं आर्थिक केंद्र आहे तसं दुसरं आर्थिक केंद्र धारावीत आलं पाहिजे. धारावीचा प्लॅन पाहिजे ना तुम्हाला? हा घ्या प्लॅन! अशा शब्दांत ठाकरेंनी धारावीच्या विकासाचा आपला प्लॅन सरकारला सांगितला. (Latest Sport News)

Dharavi Slum
Mahesh Kumawat: संसदेच्या सुरक्षा भंग प्रकरणातील सहाव्या आरोपीला अटक; कोण आहे हा तरुण?

मी ऐकतोय की पोलिसांचं इथं विशेष पथक ठेवण्यात आलं आहे. पण मी पोलिसांना सांगतोय की, सरकारं येतात आणि जातात. तुमचं रेकॉर्ड खराब करु नका. नोंद तुमच्याकडं पण होते नोंद जनतेकडंही होते. काही निवृत्त पोलिस ते आणि त्यांचे गुंड इकडं सोडले आहेत. त्यांची गुंडागर्दी तिथल्या तिथेच ठेचून काढा.

तुमच्यासोबत पोलीस नाही आले तर मी तुमच्यासोबत येईन. दुसरी गोष्ट माझ्या माहितीप्रमाणं १०० कोटींच्यावर टीडीआर यांना मिळतोय. म्हणजे यांच्या पिढ्यानं पिढ्या बसून खातील. हा ते सगळीकडं वापरणार आहेत, अशा शब्दांत ठाकरेंनी राज्यातील आणि केंद्रातील सरकारवर हल्लाबोल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.