Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांनी आज संयुक्त समाजवादी संमेलनात लताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. तोडा फोडा राज्य करा हे जास्त काळ टिकणार नाही. जर भाजपने ईव्हीएम घोटाळा केला तर देशात असंतोष पसरेल, असे देखील ठाकरे म्हणाले. यावेळी लढाई माजवादी विरुद्ध समाजवादी असल्याचा टोला देखील त्यांना भाजपला लगावला.
तसेच भाजपने लोकसभेसाठी पहिली यादी जाहीर केली. यामध्ये महाराष्ट्रातील एकही नाव नसल्याने उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजपच्या पहिल्या उमेदवारी यादीत निष्ठावंत नितीन गडकरी ह्यांचं नाव नाही. मात्र ज्यांनी बेहिशेबी मालमत्ता जमा केली त्या कृपाशंकर सिंह ह्यांचं नाव आहे. ही आजची भाजपा, असल्याचे ठाकरे म्हणाले.
जनतेचा रेट्या समोर कितीही मोठा हुकूमशहा असेल तर तो टिकत नाही. जशी स्टेशन्सची नाव बदलली, शहरांची नावे बदलली तसं आता ‘जुमला’चं नामकरण ‘गॅरंटी’ असं झालेलं आहे, असा टोला ठाकरे यांनी मोदींना लगावला.
उद्धव ठाकरे म्हणाले, ज्यावेळी देशाला लढवय्यांची गरज आहे, त्यावेळी समाजवादी गणराज्य पक्षाची स्थापना झालीय. यावेळी लढाई माजवादी विरुद्ध समाजवादी, अशी आहे. जनतेने ठरवायचंय, तुम्हाला माजलेले लोकं हवीत की तुम्हाला समजून घेणारे समाजवादी लोकं हवी आहेत? मोदीजी फक्त गावांचं, योजनांचं नाव नाही बदलत तर त्यांनी आता जुमल्याचं नाव पण ‘गॅरंटी’ केलंय. भ्रष्टाचार करा, भाजपमध्ये जा! तुमचा केसही वाकडा होणार नाही, ही ‘मोदी गॅरंटी’ आहे.
काँग्रेसकडे जर ८०० कोटी असतील, तर भाजपकडे ८००० कोटी आहेत. मग देश कुणी लुटला? कूमशाहीला आता एकच पर्याय, लोकशाही वाचवणे, असे ठाकरे म्हणाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.