Thackeray Vs Shinde: महाराष्ट्रातल्या या 13 जागा ठरवणार शिवसेनेचा खरा ढाण्या वाघ कोण?

पुढे जाऊन शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे दोन्हीही त्यांना मिळाले. अशावेळी खरी शिवसेना आमचीच आहे |Later he got both Shiv Sena party and Dhanushyaban. In that case, the real Shiv Sena is ours
Thackeray Vs Shinde: महाराष्ट्रातल्या या 13 जागा ठरवणार शिवसेनेचा खरा ढाण्या वाघ कोण?
Thackeray Vs Shinde shivsena sakal
Updated on

Loksabha 2024 News: लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा दिवस आता जवळ येऊ लागला आहे. अशावेळी कोण विजयी होणार आणि कोण पराजित होणार याविषयी विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. राजकीय विश्लेषकांच्या मते यंदाचा निकाल नक्की कोणाच्या बाजूने लागेल हे सांगणं अतिशय कठीण आहे. (loksabha maharashtra)

असं जरी असलं तरी शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना महाराष्ट्रामध्ये तेरा ठिकाणी पहायळा मिळणार आहे. यामुळे शिवसैनिक कोणासोबत आहेत? खरी शिवसेना कोणासोबत आहे? शिवसेनेचा ढाण्या वाघ नक्की कोण? हे यंदाच्या निवडणुकीमुळे स्पष्ट होणार आहे. (maharashtra news)

Thackeray Vs Shinde: महाराष्ट्रातल्या या 13 जागा ठरवणार शिवसेनेचा खरा ढाण्या वाघ कोण?
Eknath Shinde vs Uddhav Thackeray: नाशकात डिवचणाऱ्या ठाकरे गटाला शिंदेंचं बाण मारून प्रत्युत्तर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंड केलं. चाळीस आमदार आणि तेरा खासदार आपल्या बाजूला वळवले. पुढे जाऊन शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे दोन्हीही त्यांना मिळाले. अशावेळी खरी शिवसेना आमचीच आहे असा दावा शिवसेना एकनाथ शिंदे गट करत आहे.

तर दुसरीकडे कोणीही कुठेही गेलं असलं तरी देखील शिवसैनिक आमच्यासोबत आहेत. पक्ष आणि चिन्ह त्यांनी चोरलं आहे. शिवसेना खरी आमची आहे. असा दावा ठाकरे गट करत आहे.(uddhav thackeray shivsena)

महाराष्ट्रात पाहायला गेलो तर ठाणे जिल्हा आणि महाराष्ट्रातला काही भाग वगळला तर शिवसेनेचे बहुतांश कार्यकर्ते आणि शिवसैनिक हे ठाकरेंसोबतच आहेत असे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र ठाकरेंवर कित्येक जण अजूनही नाराज असून त्यांच्या एकंदरीत कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत आहेत. तर दुसरीकडे मतदार राजा आपल्या सोबत आहे असा दावा दोन्ही गटांकडून केला जात आहे.(marathi news)

Thackeray Vs Shinde: महाराष्ट्रातल्या या 13 जागा ठरवणार शिवसेनेचा खरा ढाण्या वाघ कोण?
Thackeray Vs Shinde: दोन्ही गट पुन्हा कोर्टात! ठाकरेंची वकिलांसोबत ४ तास बैठक; नार्वेकरांच्या निकालाची आज होणार चिरफाड

सुरुवातीपासून जर पाहिला गेलो तर कट्टर हिंदुत्ववादी विचारधारा असणारे सर्व मतदार हे शिवसेनेसोबत असल्याचे पाहायला मिळत होते. तर मुस्लिम मतदार व अल्पसंख्यांक मतदार हा नेहमीच शिवसेने विरोधात मतदान करायचा हे चित्र होते. मात्र आता मुस्लिम मतदार यंदा ठाकरे यांना पसंती देतील असे चित्र आहे. परंतु कट्टर हिंदुत्ववादी आणि मराठी मतदार नक्की कोणाच्या बाजूने उभा राहतो हे पाहणं अतिशय उत्सुकतेच असणार आहे. यातच राज ठाकरे यांनी मोदींना दिलेल्या पाठिंबामुळे ही निवडणूक चांगलीच इंटरेस्टिंग असणार आहे(raj thackeray vs uddhav thackeray)

सरते शेवटी, एकनाथ शिंदे यांच्याकडे धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष दोन्हीही असलं तरीदेखील ठाकरेंना मानणारा वर्ग हा महाराष्ट्रामध्ये मोठा आहे. अशावेळी एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर आपला करिष्मा कशाप्रकारे दाखवतात ? आणि ठाकरे शिंदें सोबत असणाऱ्या भाजपच्या पाठिंब्याला कशाप्रकारे अंगावर घेतात? हे पाहणं अतिशय उत्सुकतेच असून मतदार राजा नक्की कोणाला कौल देणार हे पाहणं अतिशय उपस्थितेचं असणार आहे.(eknath shinde shivsena)

Thackeray Vs Shinde: महाराष्ट्रातल्या या 13 जागा ठरवणार शिवसेनेचा खरा ढाण्या वाघ कोण?
Raj Thackeray Vs Eknath Shinde: ठाण्यात राज ठाकरेंची मोठी खेळी! CM शिंदेंना दिला मोठा धक्का; पदाधिकाऱ्यांचा सेनेला रामराम

याच त्या १३ जागा

ठाणे - नरेश म्हस्के (शिवसेना) विरुद्ध राजन विचारे (ठाकरे गट)

कल्याण - श्रीकांत शिंदे (शिवसेना) विरुद्ध वैशाली दरेकर (ठाकरे गट)

उत्तर पश्चिम मुंबई - रवींद्र वायकर (शिवसेना) विरुद्ध अमोल कीर्तीकर (ठाकरे गट)

दक्षिण मध्य मुंबई - राहुल शेवाळे (शिवसेना) विरुद्ध अनिल देसाई (ठाकरे गट)

दक्षिण मुंबई - यामिनी जाधव (शिवसेना) विरुद्ध अरविंद सावंत (ठाकरे गट)

नाशिक - हेमंत गोडसे (शिवसेना) विरुद्ध राजाभाऊ वाजे (ठाकरे गट)

Thackeray Vs Shinde: महाराष्ट्रातल्या या 13 जागा ठरवणार शिवसेनेचा खरा ढाण्या वाघ कोण?
Shinde vs Thackeray: जे राणेंचं झालं ते ठाकरेंचं होणार? 'नालायक' शब्दावरुन वातावरण तापलं.... शिंदे गट आक्रमक!

छ. संभाजीनगर- संदिपान भुमरे (शिंदे गट) विरुद्ध चंद्रकांत खैरे (ठाकरे गट)

मावळ - श्रीरंग बारणे (शिंदे गट) विरुद्ध संजोग वाघेरे-पाटील (ठाकरे गट)

शिर्डी - सदााशिव लोखंडे (शिंदे गट) विरुद्ध भाऊसाहेब वाकचौरे (ठाकरे गट)

बुलडाणा - प्रतापराव जाधव (शिंदे गट) विरुद्ध नरेंद्र खेडेकर (ठाकरे गट)

यवतमाळ - वाशिम राजश्री पाटील (शिंदे गट) विरुद्ध संजय देशमुख (ठाकरे गट)

हिंगोली - बाबूराव कदम (शिंदे गट) विरुद्ध नागेश पाटील आष्टीकर (ठाकरे गट)

हातकणंगले - धैर्यशील माने (शिंदे गट) विरुद्ध सत्यजीत पाटील (ठाकरे गट)

Thackeray Vs Shinde: महाराष्ट्रातल्या या 13 जागा ठरवणार शिवसेनेचा खरा ढाण्या वाघ कोण?
Shivsena : ''मुंबईतल्या ३७ मशिदींमधून भाजपला मतदान न करण्याचे फतवे'' शिवसेनेचा गंभीर आरोप, गुन्हा दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.