Ulhasnagar: दसऱ्यालाच 25 नागरिकांना हरवलेले मोबाईल गिफ्ट, पोलिसांची कामगिरी

Ulhasnagar: दसऱ्यालाच 25 नागरिकांना हरवलेले मोबाईल गिफ्ट, पोलिसांची कामगिरी
Updated on

Latest Crime NEws: गहाळ झालेले किंबहूना हरवलेले मोबाईल आज नेमक्या दसऱ्याच्या दिवशी नागरिकांना रिटर्न करण्याची कौतुकास्पद कामगिरी उल्हासनगरातील हिललाईन पोलिसांनी पार पाडली आहे.त्यामुळे नागरिकांचा दसरा सुखावणारा ठरला आहे.

गेल्या काही महिन्यात हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत 25 नागरिकांचे किमती मोबाईल गहाळ झाले होते.तशी मोबाईल मिसिंगची तक्रार नागरिकांनी केली होती.

Ulhasnagar: दसऱ्यालाच 25 नागरिकांना हरवलेले मोबाईल गिफ्ट, पोलिसांची कामगिरी
Ulhasnagar News: उल्हासनगरातील शिवसेना मेळाव्यात कल्याण पूर्वेतील उबाठा पदाधिकाऱ्यांचा प्रवेश; डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडून स्वागत..

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सुरेश पेंढार,पोलीस शिपाई उमेश गायकवाड यांनी तांत्रिक प्रणालीद्वारे विश्लेषण करून व शोध घेऊन मोबाईल प्राप्त केले.हे 25 मोबाईल 4 लाख रुपये किमतीचे असून नागरिकांना पोलीस ठाण्यात बोलावून दसऱ्याच्या दिवशी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप,पोलीस उपनिरीक्षक गणेश मोरे,पोलीस उपनिरीक्षक संग्राम मालकर व ग्रेड पोलीस उप निरीक्षक अर्जुन जाधव यांच्या हस्ते रिटर्न करण्यात आले आहेत.

Ulhasnagar: दसऱ्यालाच 25 नागरिकांना हरवलेले मोबाईल गिफ्ट, पोलिसांची कामगिरी
Ulhasnagar News : उल्हासनगरातून उभारण्यात येणार कल्याण प्रेम ऑटोला जोडणारा उड्डाणपूल; ओमी कलानी यांची पत्रकार परिषदेत माहिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.