Ulhasnagar: तब्बल ३२ वर्षांनी पप्पू कालानी गेले काँग्रेस कार्यालयात, मुलाच्या आमदारकीसाठी मोर्चेबांधणी?

Latest Thane News: 2002 मध्ये पार पडलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत पप्पू कालानी यांनी राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आणली.
Ulhasnagar: तब्बल ३२ वर्षांनी पप्पू कालानी गेले काँग्रेस कार्यालयात, मुलाच्या आमदारकीसाठी मोर्चेबांधणी?
Ulhasnagar After 32 years Pappu Kalani in Congress office omi kalai for Maharashtra Vidhan sabha election 2024 sakal
Updated on

Thane politics latest Update : : काँग्रेस मधून नगरसेवक,नगराध्यक्ष आणि आमदार अशी सुरवात करून हत्या प्रकरणात आणि जन्मठेपेची शिक्षा लागल्याने जेलमध्ये गेलेले पप्पू कालानी आता जेलच्या बाहेर आले आहेत.त्यांचे चिरंजीव टीम ओमी कालानीचे सर्वेसर्वा ओमी कालानी यांनी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून उल्हासनगर विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी रणशिंग फुंकले आहे. .त्यासाठी मोर्चेबांधणी करणारे पप्पू कालानी यांनी तब्बल 32 वर्षांनी काँग्रेस कार्यालयात भेट देऊन पदाधिकाऱ्यांशी गुफ्तगू केली आहे.

Ulhasnagar: तब्बल ३२ वर्षांनी पप्पू कालानी गेले काँग्रेस कार्यालयात, मुलाच्या आमदारकीसाठी मोर्चेबांधणी?
Ulhasnagar: उल्हासनगरात उकडत्या डांबरात खड्डे बुजवण्याची आधुनिक टेक्नॉलॉजी

1986 साली पप्पू कालानी हे काँग्रेस पक्षाकडून नगरसेवक म्हणून निवडून आले होते.1987 मध्ये ते नगराध्यक्ष झाले आणि 1990 साली ते काँग्रेसचे आमदार झाले.पप्पू कालानी यांनी नेहरू चौकातील काँग्रेस कार्यालयाला शेवटची भेट ही 1992 मध्ये दिली होती.त्याच दरम्यान रिक्षा युनियनचे नेते मारुती जाधव यांच्या हत्येप्रकरणी टाडा लावण्यात आला.

पुढे याच प्रकरणात त्यांना अटक केल्यावर काँग्रेस पक्षाने पप्पू कालानी यांना 6 वर्षांसाठी पक्षातून काढले.मारुती जाधव हत्या प्रकरणात पप्पू कालानी 1992 ते 2002 असे जवळपास 10 वर्षे पुण्याच्या येरवडा कारागृहात राहिले.त्यांची जामिनावर सुटका झाल्यावर उल्हासनगरात केर आयो पप्पू शेर आयो हे गाणे गुंजले.आणि 2002 मध्ये पार पडलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत पप्पू कालानी यांनी राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आणली.

Ulhasnagar: तब्बल ३२ वर्षांनी पप्पू कालानी गेले काँग्रेस कार्यालयात, मुलाच्या आमदारकीसाठी मोर्चेबांधणी?
Ulhasnagar: ऑफिसमध्ये घुसून व्यावसायिकावर केला जीवघेणा हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद

2012 मध्ये न्यायालयाने पप्पू कालानी यांना इंदर बठीजा हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली.आणि कोरोनाच्या काळात 70 वर्षांवरील कैद्यांना मुभा देण्यात आल्याने कालानी 2021 मध्ये जेलच्या बाहेर आले आहेत.अशात ओमी कालानी यांची पत्नी पंचम कालानी ह्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्ष असतानाही ओमी यांनी कल्याण लोकसभेत खासदार डॉ.श्रीकांत शिंदे याच्याशी दोस्ती का गठबंधन निभावताना विधानसभा निवडणूक लढवणार असे जाहीर केले होते.त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे उमेदवारी मागणार.

तिकीट मिळाले नाही तर अपक्ष उभे राहणार असे स्पष्ट केले आहे.त्यानुसार टीम ओमी कालानी यांची कोअर कमिटीची बैठक गोव्यात संपन्न झाली आहे.विशेष म्हणजे या कमिटीचे अध्यक्ष काँग्रेसचे नेते डॉ.जयराम लुल्ला आहेत.या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही भेट दिली होती.

Ulhasnagar: तब्बल ३२ वर्षांनी पप्पू कालानी गेले काँग्रेस कार्यालयात, मुलाच्या आमदारकीसाठी मोर्चेबांधणी?
Ulhasnagar News : महानगरपालिकेत कॉन्ट्रॅक्टवर 12 तरुण कनिष्ठ अभियंताची नवी टीम, 5 तरूणींचा समावेश

जेलमधून आल्यापासून पप्पू कालानी हे ओमी कालानी यांना निवडून आणण्यासाठी ऍक्टिव्ह झाले असून त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी 32 वर्षांनी कॉग्रेस कार्यालयाला भेट देऊन जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांच्याशी मोर्चेबांधणीची चर्चा केली आहे.

यावेळी टीम ओमी कालानीचे कमलेश निकम,मनोज लासी,काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.याबाबत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांच्याशी विचारणा केली असता ओमी कालानी यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे.पवार यांचा पक्ष महाविकास आघाडीत असून आम्ही एकदिलाने ओमी यांचे काम करणार आहोत.पक्षाकडून तिकीट मिळाले नाही आणि ओमी यांनी अपक्ष निवडून लढवली व महाविकास आघाडीने त्यांना समर्थन दिले तरी ओमी यांना निवडून आणण्यासाठी काँग्रेस प्रचारात उतरणार असे रोहित साळवे यांनी सांगितले.

Ulhasnagar: तब्बल ३२ वर्षांनी पप्पू कालानी गेले काँग्रेस कार्यालयात, मुलाच्या आमदारकीसाठी मोर्चेबांधणी?
Ulhasnagar Shivsena: विधानसभेच्या तोंडावर खळबळ, उल्हासनगर शिवसेना आणि महिला आघाडीची कार्यकारिणी बरखास्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.