उल्हासनगर - भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी ज्यांना गद्दार बोलतात, ते मुख्यमंत्री होतात' असे खळबळजनक विधान केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. या विधानाने आक्रमक झालेल्या शिवसेनेने शिवसेना रामचंदानी यांनी माफी मागितली नाही तर महायुतीचे उमेदवार कुमार आयलानी यांच्या प्रचारात सहभागी होणार नाही असा पवित्रा घेतला होता. त्यामुळे आयलानी टेन्शनमध्ये होते. शेवटी शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या पुढाकाराने उल्हासनगरात महायुतीची बैठक पार पडली असून, त्यात शिवसेना-भाजपात दिलजमाई झाली आहे. त्यामुळे आयलानी यांनी मोकळा श्वास घेतला आहे.