उल्हासनगर - उल्हासनगर 141 विधानसभा निवडणुकीत 26 पैकी 7 उमेदवारांनी माघार घेतल्याने 19 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. त्यात महायुती मधील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष भरत गंगोत्री यांनी उमेदवारी अर्ज मागे न घेता बंडखोरी कायम ठेवली आहे. तर माघार घेणाऱ्या 5 जणांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार ओमी कलानी यांना समर्थन दिले आहे.