कोरोना नियम मोडणारा उल्हासनगरातील चांदणी बार सील

orchestra bar
orchestra barsakal media
Updated on

उल्हासनगर : सतत होणाऱ्या नियमांच्या उल्लंघनासह (Stopped following corona rules) विविध प्रकारच्या तब्बल ८० गुन्ह्यांची नोंद (eighty police complaint) असलेला उल्हासनगरमधील (ulhasnagar) चांदणी ऑर्केस्ट्रा बार (chandani bar sealed) गुरुवारी पालिका आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई (Municipal and police action) करत सील केला. कोरोना प्रादुर्भाव (corona infection) आणि प्रसार रोखण्यासाठी सरकारने (Government restrictions) काही निर्बंध घातले आहेत. (Ulhasnagar chandani bar sealed by government authorities because of unfollowing corona rules)

orchestra bar
31st आधी नवी नियमावली, संध्याकाळपासून पार्क, समुद्रकिनारे, मैदाने बंद

तसेच ठाणे पोलीस आयुक्तांद्वारेही काही मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत; परंतु, या आदेशांचे चांदणी ऑर्केस्ट्रा बारद्वारे सतत उल्लंघन करण्यात येत होते. भविष्यात ही पुनरावृत्ती टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून बार सील करण्यात यावा, असे पत्र मध्यवर्ती ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांनी दिले होते.

त्यानुसार प्रभाग समिती ३ चे सहायक आयुक्त अजित गोवारी यांनी पोलिस बंदोबस्तात चांदणी बार सील केला. या बारविरोधात ८० गुन्ह्यांची नोंद आहे. १० ऑक्टोबरलाही बारवर कारवाई करताना या बारमधून रात्री उशिरा ग्राहकांना मद्य पुरवणाऱ्या १७ महिला व १३ पुरुषांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.