Fire Briged: एका शाळेच्या आवारातील झाडाचा कॉल आटोपून परतीच्या मार्गावर असलेल्या उल्हासनगर महानगरपालिका फायर ब्रिगेडची खड्यात पलटी होताना वाचली आहे.त्यामुळे खड्यांची पोलखोल झाली असून तब्बल दोन तासानंतर ही फसलेल्या खड्यातून बाहेर काढण्यात आली आहे.
कॅम्प नंबर 4 मधील शिवनेरी हॉस्पिटल समोर असलेल्या शाळेच्या आवारातील झाडाच्या फांदीचा कॉल फायर ब्रिगेडला आला होता.त्यानुसार जवानांनी फांदी काढली आणि गाडी परतीच्या मार्गावर असतानाच अर्धवट सोडून दिलेल्या रस्त्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने एका साईडची गाडीची चाके खड्यात फसली.
गाडी पलटी होणार तर नाहीना या भीतीने गाडीतील ड्रायव्हर व जवानांनी उड्या मारल्या.शेवटी क्रेन बोलावण्यात आल्यावर दोन तासांच्या कसरती नंतर गाडीला बाहेर काढण्यात आल्याची माहिती अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी सुरेश बोंबे यांनी दिली.
विशेष म्हणजे आयुक्त अजीज शेख यांनी दोन दिवसांपूर्वीच अधिकाऱ्यांसह ऑन द फिल्ड उतरून नालेसफाई व रस्त्यांचा कामांचा आढावा घेऊन कामांना गती देण्याचे आदेश संबंधितांना दिले होते.तरीही आज पडलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण बदलापूर महामार्ग,खेमानी,चांदीबाई कॉलेज समोरील रोड पाण्यात गेले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.