Ulhasnagar: उल्हासनगरच्या भाईवर गुटक्यासाठी टोळक्याचा जीवघेणा हल्ला !

Crime Update: घटना सीसीटीव्हीत कैद, मध्यवर्ती पोलिसांनी 5 जणांच्या मुसक्या आवळल्या
उल्हासनगरच्या भाईवर गुटक्यासाठी टोळक्याचा जीवघेणा हल्ला !
Ulhasnagar: sakal
Updated on

Fight For Guthka: सराईत गुन्हेगार असलेल्या आणि अनेकदा जेलवारी करून आलेल्या एका भाई वरच गुटक्यासाठी टोळक्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना शनिवारच्या रात्री उल्हासनगरात घडली आहे.ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून मध्यवर्ती पोलिसांनी 5 आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

उल्हासनगर कॅम्प तीन मधील खेती एरियामध्ये अनिल कोरी हा तरुण राहतो.टेलरिंगचे काम करणारा अनिल हा सराईत गुन्हेगार असून शनिवारी रात्री तो छत्रपती शिवाजी महाराज चौकात चहा प्यायला गेला होता.त्याठिकाणी आरोपी अवि याने अनिल कडे गुटखा मागितला.अनिलने नकार दिल्यावर दोघांमध्ये वादविवाद होऊन शिवीगाळ झाली.

उल्हासनगरच्या भाईवर गुटक्यासाठी टोळक्याचा जीवघेणा हल्ला !
Ulhasnagar: उल्हासनगरात खड्यांची पोलखोल, फायर ब्रिगेड पलटी होता होता वाचली

अनिल हा घरी परतत असताना अवि आणि त्याच्या साथीदारांनी अनिलला रस्त्यात गाठून चाकू, लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला केला.ह्यात अनिल कोरी हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेची माहिती मध्यवर्ती पोलिसांना मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे,पोलीस निरीक्षक उमेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू करण्यात आला.या प्रकरणात आरोपी अवि,

उल्हासनगरच्या भाईवर गुटक्यासाठी टोळक्याचा जीवघेणा हल्ला !
Ulhasnagar Municipal Corporation : उल्हासनगर महानगरपालिकेच्या 751 कर्मचाऱ्यांना पर्मनंट रिटायरमेंट अकाउंट नंबरचे वितरण

त्याचे वडील संतोष,अर्जुन विटेकर,भोलू गुप्ता,साहिल गागट,अमोल सावंत,आयुष राय,पवन छम्मा यांची नावे निष्पन्न झाली आहेत.यातील 5 आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रविंद्र पाखरे हे फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

उल्हासनगरच्या भाईवर गुटक्यासाठी टोळक्याचा जीवघेणा हल्ला !
Ulhasnagar News: उल्हासनगरात पहिल्यादाच कर निर्धारक पदावर पालिकेच्या महिला अधिकारी!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.