Shiv Sena-BJP Controversy: '५० कुठं आणि १०५ कुठं?' शिवसेना-भाजप वाद पेटवणारा बॅनरच गेला चोरीला !

Shiv Sena-BJP Controversy: '५० कुठं आणि १०५ कुठं?' शिवसेना-भाजप वाद पेटवणारा बॅनरच गेला चोरीला !
esakal
Updated on

उल्हासनगर: कल्याण लोकसभेत शिवसेना विरुद्ध भाजप यांच्यातील वाद संपता संपत नाही. दिवा, कल्याण,डोंबिवली मध्ये शिवसेना भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये पटत नसल्याचे वारंवार दिसून येतं आहे. दरम्यान हा वाद उल्हासनगर मध्ये देखील पोचला. भाजप आणि शिवसेनेकडून जोरदार विरोधात बॅनरबाजी करण्यात येत आहे.

उल्हासनगर मध्ये शिवसेना उपजिल्हाप्रमुख अरुण आशन यांनी बॅनर लावत भाजपच्या नेत्यांना डीवचले आहे. यालाच आता भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी उत्तर देत शिवसेना टोला हाणला.

तर आता भाजपनेही बॅनर लावत भाजपला डीवचले आहे. उल्हासनगरात "५० कुठं आणि १०५ कुठं? हा आमच्या भाजपचा मोठेपणा! देवेंद्र फडणवीस साहेब नाम ही काफी है!" अशा आशयाचे बॅनर भाजप तर्फे लावण्यात आले आहेत.

Shiv Sena-BJP Controversy: '५० कुठं आणि १०५ कुठं?' शिवसेना-भाजप वाद पेटवणारा बॅनरच गेला चोरीला !
Uniform Civil Code: समान नागरी कायदाच्या अनुषंगाने केंद्रात हालचालींना वेग; कायदा आयोगाने पुन्हा मागविली मतं

कल्याण लोकसभेत शिवसेना (शिंदे गट) विरुद्ध भाजप यांच्यातील वाद संपता संपत नाही आहे. यातच ठाणे आणि कल्याण हे दोन्ही लोकसभा मतदार संघ आपले होते आणि यापुढेही राहतील, असा दावा नेत्यांनी करताच मेळाव्याला उपस्थितीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देऊन त्याला प्रतिसाद दिला.

तर दुसरीकडे डोंबिवलीत भाजपने पत्रकार परिषद घेत मानपाडा पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तर डोंबिवली मधील भाजप पदाधिकारी नंदू जोशी प्रकरण चांगलचं पेटलं असून या प्रकरणातील पीडित महिला संतापली असून तिने पोलीस ठाण्यासमोरच गेल्या दिवसांपासून उपोषणाला बसली आहे. दरम्यान या वादाचे पडसाद आता उल्हासनगर पर्यंत पोचले आहेत.

उल्हासनगर मध्ये शिवसेना उपजिल्हाप्रमुख अरुण आशन यांनी बॅनर लावत भाजपच्या नेत्यांना डीवचले आहे. "कमजोर लोग ही शिकवा और शिकायत करते है, महान लोग तो हमेशा कर्म की वकालत करते है...! माझा नेता माझा अभिमान" अश्या आशयाचे बॅनर उल्हासनगर कॅम्प 4 मध्ये आशन यांनी लावले होते, यालाच उत्तर देत भाजपने सुद्धा बॅनर लावत शिंदे गटाला डिवचलं आहे.

उल्हासनगरात "५० कुठं आणि १०५ कुठं? हा आमच्या भाजपचा मोठेपणा! देवेंद्र फडणवीस साहेब नाम ही काफी है!" अशा आययाचे बॅनर भाजप तर्फे लावण्यात आहेत.त्यामुळे उल्हासनगर मध्ये भाजप आणि शिंदे गट (शिवसेना) यांच्यात बॅनरवॉर सुरु आहे.

दरम्यान या सर्व प्रकरणावर मनसेने आपली प्रतिक्रिया देत सांगितले की समस्यांपासून लक्ष वळवण्यासाठी भाजप - शिवसेना (शिंदे गटाची) ही खेळी सुरू आहे. यांचे युती शंभर टक्के होणार व कल्याण लोकसभेत शिवसेनेचा उमेदवार राहणार हे सर्व पुन्हा एकत्र काम करणार, असा गोप्यस्फोट मनसे आमदार राजू पाटील यांनी केला आहे.

शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट ) माजी आमदार सुभाष भोईर यांनी घेतली भाजप आमदार गणपत गायकवाड यांची भेट...

कल्याण लोकसभेत राज्यकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आखणी करण्यास सुरुवात केली आहे. मतदारसंघात आढावा बैठका घेत पक्षाचे मजबुतीकरण करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी आपली कंबर कसली आहे.

जागा वाटपाच्या चर्चा सध्या सुरु असून त्या जागांवर आपली वर्णी लावण्यासाठी इच्छुकांमध्ये ही चढाओढ लागली असल्याचे दिसते. कल्याण लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून मुख्यमंत्र्यांचे सुपूत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे याचे प्रतिनिधीत्व करतात.

Shiv Sena-BJP Controversy: '५० कुठं आणि १०५ कुठं?' शिवसेना-भाजप वाद पेटवणारा बॅनरच गेला चोरीला !
Uniform Civil Code: 2024 पर्यंत राज्यांनी 'समान नागरी कायदा' लागू न केल्यास...; शहांचा थेट इशारा

या मतदारसंघावर भाजपाने आपले लक्ष केंद्रीत केल्यानंतर महाविकास आघाडीने देखील या ठिकाणी चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीकडून आनंद परांजपे यांच्या नावाची चर्चा होत असतानाच ठाकरे गटाकडून माजी आमदार सुभाष भोईर यांच्या नावाची चर्चा सुरु आहे.

यातच आता शिवसेना (उद्धव ठाकरे गट ) कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख आणि माजी आमदार सुभाष भोईर यांनी कल्याण पूर्वेत जाऊन भाजप आमदार गणपत गायकवाड यांची खासगी भेट घेतली आहे, त्यामुळे ही भेट का घेतली असावी याची चर्चा रंगू लागली आहे. बंद दरवाजा आड या दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली असावी?

सुभाष भोईर यांनी लोकसभा निवडणूकेची तयारी आतापासूनचं करत आहे का? की भोईर भाजप मध्ये प्रवेश करणार आहेत? असे सवाल उपस्थित केले जात आहेत.

दरम्यान भोईर हे गायकवाड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आले होते, अशी माहिती मिळाली असून याबाबत गायकवाड यांनी सांगितले की आमचे घरचे संबंध आहेत, सभागृहात सुद्धा आम्ही एकत्र काम केले आहे, ते मला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.