नाशिकनंतर आता उल्हासनगरमध्येही 'मॅग्नेट मॅन'; फोटो व्हायरल

नाशिकच्या माणसाप्रमाणेच लसीच्या दुसऱ्या डोसनंतर 'असं' होत असल्याचा दावा (Ulhasnagar man claims developing magnetic power after vaccination second dose)
नाशिकनंतर आता उल्हासनगरमध्येही 'मॅग्नेट मॅन'; फोटो व्हायरल
Updated on

नाशिकच्या माणसाप्रमाणेच लसीच्या दुसऱ्या डोसनंतर 'असं' होत असल्याचा दावा

मुंबई: कोरोना प्रतिबंधक लसीचा (corona vaccine) दुसरा डोस घेतल्यानतंर शरीरात चुंबकत्व निर्माण होत असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. नाशिकमध्ये असा प्रकार समोर आला. 71 वर्षीय अरविंद सोनार यांना लोखंडी आणि स्टीलच्या वस्तू चिकटत असल्याचा दावा त्यांनी केला. कोविशील्डचा दुसरा डोस घेतल्यावर असं घडत असल्याचं त्यांनी सांगितलं. या दाव्यामध्ये फारसं तथ्य नसल्याचं तज्ञ्जांकडून सांगितलं जात असतानाच चुंबकत्व शक्ती निर्माण होण्याचे आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. राज्यातील उल्हासनगर शहरात राहणाऱ्या एका तरूणानेही असाच दावा केला आहे. (Ulhasnagar man claims developing magnetic power after vaccination second dose)

नाशिकनंतर आता उल्हासनगरमध्येही 'मॅग्नेट मॅन'; फोटो व्हायरल
"औषधांवरीस GST कमी करून काही होणार नाही, त्यापेक्षा..."

नाशिकच्या माणसाचा असा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर यावर आश्चर्य व्यक्त केलं जात होते. पण आता उल्हासनगरमधील एका तरूणानेही असाच दावा केला आहे. उल्हासनगर कॅम्प क्रमांक एकच्या गणगौर चौकात राहणारा शांताराम चौधरी या तरूणाने आपला मुद्दा सिद्ध करण्यासाठी एक व्हिडिओ बनविला आहे, त्यात घरातले चमचे, लहान प्लेट्स आणि भांडी शांतारामच्या शरीराला चिकटलेली दिसत आहेत. सध्या हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर अशी शक्ती निर्माण झाल्याचे त्या तरूणाचे म्हणणे आहे. चलनी नाणी, स्टीलच्या प्लेट्स, चमचे, वाट्या अशा काही गोष्टी त्याच्या शरीरातील चुंबकत्व शक्तीच्या जोरावर त्याला अंगाला चिकटत असल्याचे व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे.

लसीच्या डोसनंतर ताप येणे आणि इतर साईड इफेक्ट्स जाणवणे हे ठीक होते. पण अशा प्रकारे चुंबकत्व शक्ती शरिरात निर्माण होत असल्याचे दावे केले जात असल्याने याबद्दल भलतंच आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

नाशिकनंतर आता उल्हासनगरमध्येही 'मॅग्नेट मॅन'; फोटो व्हायरल
भाजपच्या प्रवीण दरेकर यांचा राज्य सरकारला इशारा, म्हणाले...

दुसरा डोस आणि चुंबकत्व शक्ती, डॉ. लहाने म्हणतात...

प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ आणि राज्याच्या टास्क फोर्सचे सदस्य तात्याराव लहाने यांनी या मुद्द्यावर आपले मत व्यक्त केले. "लस घेतल्यानंतर शरीरात लोहचुंबकत्व निर्माण होत नाही. कोट्यवधी लोकांनी आतापर्यंत लस घेतली आहे, त्यात २ टक्के लोकांवर साईड इफेक्ट होतात. शरीरात चुंबकत्व निर्माण होतं हे एक टक्के लोकांच्या बाबतीत पकडलं तर, लाखो लोकांच्या बाबतीत असं झालं पाहिजे. फक्त एकाच माणसाला असं होत असेल, तर ते लसीमुळे नक्कीच झालेलं नाहीये", असे तात्याराव लहाने म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()