Ulhasnagar: उल्हासनगर शासकीय रुग्णालयाने गर्भवती महिलेच्या पोटातून 'दीड किलोचा' मांसाचा गोळा काढला

Ulhasnagar: डॉक्टरांच्या कौशल्यामुळे आई-बाळाला जीवनदान
ulhasnagar medical surgery
ulhasnagar medical surgerysakal
Updated on

उल्हासनगर: एकीकडे महिला गर्भवती,त्यात तिच्या पोटात वाढलेला मासाचा गोळा,ऑपरेशन करून त्या गोळ्याला बाहेर काढताना गर्भातील बाळाला इजा तर पोहचणार नाही ना?सुरवातीला।याच मनस्थितीत असलेल्या उल्हासनगर शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.मनोहर बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.तृप्ती रोकडे यांच्या टीमने कौशल्य पणाला लावले आणि गर्भवती महिलेच्या पोटातून दीड किलोचा मासाचा गोळा बाहेर काढून आई व बाळाला जीवनदान देण्याचा करिश्मा केला आहे.या अत्यंत धोकादायक आणि जटिल अशा या शस्त्रक्रियेने वैद्यकीय क्षेत्रात नव्या इतिहासाची नोंद केली असून शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय सेवांची कार्यक्षमता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.

बदलापूर आणि मुरबाडच्या शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका गर्भवती महिलेच्या पोटात दीड किलोचा मांसाचा गोळा आढळला होता.गर्भवती असल्यामुळे तिच्यावर कोणतेही सामान्य उपचार शक्य नव्हते.आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने तिने शासकीय रुग्णालयातच उपचार घेण्याचे ठरवले.मात्र पोटातील गोळ्याची आणि बाळाची स्थिती अत्यंत गंभीर आणि धोकादायक होती.स्थानिक रुग्णालयांमध्ये या शस्त्रक्रियेसाठी आवश्यक ते वैद्यकीय साधनसामग्री नसल्यामुळे तिला उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात हलवण्यात आले.

ulhasnagar medical surgery
Mumbai Helth News: मुंबईकरांनो सावधान! टीबीचा विळखा होतोय घट्ट; आकडेवारी वाचून बसेल धक्का

इथे दाखल झाल्यानंतर तिच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. या शस्त्रक्रियेला डॉक्टरांच्या टीमने अत्यंत नियोजनपूर्वक आणि काळजीपूर्वक हाताळले.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.मनोहर बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.तृप्ती रोकडे,डॉ.नम्रता कुलकर्णी,डॉ.हनुमंत डोईफोडे,आणि भूल तज्ञ अमोल शेटे या डॉक्टरांनी एकत्रितपणे शस्त्रक्रिया करत दीड किलोचा मांसाचा गोळा बाहेर काढला.विशेष म्हणजे,या शस्त्रक्रियेदरम्यान तिची प्रसूतीही सुरक्षित पार पडली. या यशस्वी शस्त्रक्रियेचे श्रेय फक्त डॉक्टरांनाच नाही तर या प्रक्रियेत सहकार्य करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांनाही जाते. इन्चार्ज राखी कुलकर्णी, स्टाफ नर्सेस, आणि इतर सहाय्यक कर्मचार्‍यांनीही अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान दिले.

शस्त्रक्रियेनंतर महिला आणि तिचे बाळ दोघेही पूर्णतः सुरक्षित आहेत. यशस्वी शस्त्रक्रियेमुळे आई आणि बाळाचे प्राण वाचले असून, कुटुंबियांनी शासकीय रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानल्याची माहिती डॉ.मनोहर बनसोडे, डॉ. तृप्ती रोकडे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.