Ulhasnagar News : जेलमध्ये असणारे आमदार गणपत गायकवाड यांची पत्नी राजकारणात ऍक्टिव्ह

आमदार गणपत गायकवाड हे गोळीबार प्रकरणात जेलमध्ये असून याच प्रकरणामध्ये त्यांचे चिरंजीव वैभव गायकवाड हे फरार असून, ते जामिनासाठी प्रयत्न करत आहेत.
Sulbha Gaikwad
Sulbha Gaikwadsakal
Updated on

उल्हासनगर - आमदार गणपत गायकवाड हे गोळीबार प्रकरणात जेलमध्ये असून याच प्रकरणामध्ये त्यांचे चिरंजीव वैभव गायकवाड हे फरार असून, ते जामिनासाठी प्रयत्न करत आहेत. अशा प्रसंगी आमदार गायकवाड यांच्या निधीतील पूर्ण झालेल्या विकास कामांच्या उद्घाटनासाठी आमदार गायकवाड यांची पत्नी सुलभा गायकवाड ह्या राजकारणात ऍक्टिव्ह झाल्या असून त्यांनी उल्हासनगरातील तीन विकासकामांचे उद्घाटन केले आहे.

गणपत गायकवाड हे हिललाईन ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या कॅबिनमध्ये शिवसेना शिंदे गटाचे कल्याण पूर्वेचे शहरप्रमुख महेश गायकवाड व त्यांच्या साथीदारांवर गोळीबार केल्याप्रकरणी सध्या तळोजा जेलमध्ये आहेत.

याच प्रकरणात त्यांचे चिरंजीव वैभव गायकवाड हे फरार आहेत. तत्पूर्वी आमदार गायकवाड हे बाहेर असताना त्यांनी केलेल्या पाठपुराव्याने कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रातील उल्हासनगर पूर्वेत 5 कोटींची विकासकामे मंजूर झाली आहेत. मात्र गायकवाड हे जेलमध्ये असल्याने या विकासकामांचे भूमिपूजन कोण करणार असा प्रश्न निर्माण झाला होता.

अशावेळी अचानक राजकारणात ऍक्टिव्ह झालेल्या आमदार गायकवाड यांची पत्नी सुलभा गायकवाड यांनी बॅरेक नंबर 1447, इसरदास दरबार शेजारी, पूनम हॉटेल शेजारी, गणपती मंदिर समोर, श्रीराम नगर, महादेव चाळ, सतरामदास येथील विकासकामांचे भूमिपूजन केले. यावेळी रेश्मा नवले, निलेश बोबडे, योगेश म्हात्रे, सुनील ताबेकर, भावेश टोल, पिंकी सिंग, स्नेहल राणे, महेश इसरदारबर आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()