Ulhasnagar : नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी विद्युत पोलवर चढलेले उल्हासनगरातील महावितरणचे सिनिअर टेक्निशियन उज्वल गणेरकर यांचा शॉक लागून मृत्यू झाला आहे.तक्रार येताच तात्काळ त्याची दखल घेणारे गणेरकर यांनी जीवनातून घेतलेल्या अनपेक्षित एक्झिटमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
उज्वल गणेरकर हे लालचक्की विभागीय कार्यालयात सिनिअर टेक्निशियन म्हणून काम करत होते.मराठा सेक्शन भागातून आलेल्या तक्रारींचे निवारण करण्याकरिता पोलवर चढले असता ,त्यांना शॉक लागल्यावर ते खाली पडले.त्यांना शासकीय रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी मृत घोषित केले.
38 वर्षीय गणेरकर हे विवाहित असून त्यांना मुलबाळ नव्हते.शासकीय नियमानुसार त्यांच्या कुटुंबाला आर्थिक नुकसान भरपाई मिळणार आहे.तसेच त्यांच्या पत्नीला नोकरी मिळावी असा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येणार असल्याचे कार्यकारी अभियंता प्रविण चकोले यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.