Ulhasnagar News : करबुडव्यांवर कडक कारवाईचे आयुक्तांचे आदेश: उत्पन्न वाढीसाठी घेतली बैठक

उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत असलेल्या मालमत्ता कर, पाणीपट्टी व नगर रचना विभागांच्या प्रमुखांसोबत उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त विकास ढाकणे यांनी उत्पन्न वाढीसाठी बैठक घेतली आहे.
Ulhasnagar Municipal Commissioner vikas dhakane
Ulhasnagar Municipal Commissioner vikas dhakanesakal
Updated on

उल्हासनगर - उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत असलेल्या मालमत्ता कर, पाणीपट्टी व नगर रचना विभागांच्या प्रमुखांसोबत उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त विकास ढाकणे यांनी उत्पन्न वाढीसाठी बैठक घेतली आहे. त्यात वसुलीसाठी करबुडव्यांवर वॉरंट बजावणे, जप्ती करणे, अटकावणी करण्याचे आदेश मालमत्ता कर विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

सदर आढावा बैठकीत महापालिका क्षेत्रातील एकुण मालमत्ता 1 लाख 83 हजार 550 असून त्यापैकी निवासी मालमत्ता 1 लाख 36 हजार 543 व अनिवासी मालमत्ता 47 हजार 7 आहेत. थकबाकीची मागणी 819 कोटी 18 लाख 98 हजार 455 रुपये असून चालु मागणी ही 117 कोटी 80 लाख 94 हजार 43 रुपये आहे.

एकंदरीत एकुण 936 कोटी 99 लाख 92 हजार 498 रुपयांपैकी थकबाकी वसुली आणि चालू वसुलीपैकी 4 ऑक्टोबर पर्यंत 61 कोटी 67 लाख 37 हजार 838 रुपये वसुली झालेली आहे. या वसुलीला गती देण्यासाठी करबुडव्यांवर वॉरंट बजावणे, जप्ती करणे, अटकावणी करण्याचे आदेश आयुक्त विकास ढाकणे यांनी मालमत्ता कर विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

या बैठकीत आयुक्त विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, किशोर गवस, मुख्य लेखापरिक्षक शरद देशमुख, मुख्यलेखाधिकारी किरण भिलारे, कर निर्धारक व संकलक निलम कदम, सहायक आयुक्त अजय साबळे, मयुरी कदम, गणेश शिंपी, मनिष हिवरे, पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता सहाय्यक दिपक ढोले, उपकर निर्धारक व संकलक सचिन वानखेडे, मनोज गोकलानी, पाणी पुरवठा विभागाचे विशेष वसुली अधिकारी विजय मंगलानी आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.