उल्हासनगर - मूळ भारतीय रेल्वे सुरक्षा सेवेतील अधिकारी असलेले विकास ढाकणे हे उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी रुजू झाले आहेत. मावळते आयुक्त डॉ. अझिझ शेख यांनी ढाकणे यांच्याकडे पदभार सोपवून उल्हासनगरच्या दोन वर्षांवरील कारकिर्दीला अलविदा केला आहे..विकास ढाकणे हे चाळिशीतले तरुण-हायडेड असून ते पुणे महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त पदावर होते. लोकसभा निवडणुकीत त्यांची बदली झाली होती. मात्र ते नियुक्तीच्या प्रतिक्षेत होते. शेवटी त्यांची प्रतिक्षा संपली असून महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने ढाकणे यांची उल्हासनगर महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, किशोर गवस, मुख्य लेखाधिकारी किरण भिलारे आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे..मावळते आयुक्त डॉ. अझिझ शेख यांनी 13 जुलै 2022 उल्हासनगर महानगरपालिकेचा पदभार स्विकारला होता. ते 31 मे 2024 रोजी सेवानिवृत्त होणार होते. पण त्यापूर्वीच ते आयएएसची परिक्षा उत्तीर्ण झाल्याने त्यांना दोन वर्षांची मुदतवाढ मिळाली आहे..आता त्यांच्या जागी विकास ढाकणे यांनी पदभार स्विकारला असून डॉ. शेख यांना नियुक्तीच्या प्रतिक्षायादीत ठेवण्यात आले आहे. नवनियुक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी सर्व विभाग प्रमुखांसोबत बैठक घेऊन त्यांच्या कामाचा आढावा घेतला आहे. मात्र ओबडधोबड रस्ते, खड्डे यांचे मुख्य आव्हान ढाकणे यांच्यासमोर आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.