उल्हासनगर पालिका प्रवेशद्वाराचे प्लॅस्टर पुन्हा पडले; स्ट्रक्चरल ऑडिटची मागणी

पहिल्यांदा नगररचनाकार व दुसऱ्यांदा स्थायी समिती सभापतींच्या गाडीचे नुकसान
Ulhasnagar municipal corporation
Ulhasnagar municipal corporation sakal media
Updated on

उल्हासनगर : 19 तारखेला पालिकेचे (Ulhasnagar Municipal corporation) नगररचनाकार प्रकाश मुळे यांच्या गाडीवर पालिकेच्या प्रवेशद्वारावरील प्लॅस्टर पडल्याची (Entrance gate plaster collapsed) घटना ताजी असतानाच, 26 तारखेला स्थायी समिती सभापती (दीपक) टोनी सिरवानी यांच्या गाडीवरही प्लॅस्टरचा तुकडा पडल्याची दुसरी घटना घडली आहे. या दोन्ही घटनेमुळे पालिकाच असुरक्षित असल्याची चर्चा उल्हासनगरात रंगली असून पालिकेने इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट (structural audit) करून घेण्याची मागणी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष जगदीश तेजवानी यांनी केली आहे.

Ulhasnagar municipal corporation
"चेहऱ्यावर हास्य आणि मनोबल कायम ठेवले तर कोणत्याही संकटावर मात करता येईल"

या दोन्ही घटनेत कोणत्याही प्रकारची अघटित घटना घडली नसली तरी प्रकाश मुळे यांच्या गाडीच्या काचेचे नुकसान झाल्याने ही काच बदलून ती नव्याने बसवण्याची वेळ मुळे यांच्यावर आली आहे. तर प्लॅस्टर पडल्याने टोनी सिरवानी यांच्या गाडीचंही नुकसान झालं आहे. पालिकेच्या प्रवेशद्वाराच्या आजूबाजूला महापौर, आयुक्त, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सभागृह नेते यांच्या गाड्या उभ्या असतात.

तर वर्किंग डे मध्ये अधिकारी, लोकप्रतिनिधी, कर्मचारी, नागरिक यांची वर्दळ असते. प्रवेशद्वाराचे सिमेंट काँक्रीटचे छत असून पावसाळ्यात त्याला गळती लागलेली असते. त्यामुळे खालील प्लॅस्टर खिळखिळे झाले असून या आठवड्यात दुसऱ्यांदा प्लास्टर गाड्यांवर पडले आहे. डोक्यावर प्लॅस्टरचा तुकडा पडून नागरिक जखमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तातडीने प्रवेशद्वाराच्या दुरुस्तीच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.