उल्हासनगर -ड्रेनेजची यंत्रणा टाकण्यासाठी उल्हासनगर महानगरपालिकेने सिमेंट काँक्रीटचे चांगले रस्ते खोदून ठेवल्याने मार्ग काढताना वाहन चालक मेटाकुटीला आले आहेत.अशातच एका जागरूक तरुणाने खोदलेल्या दगडधोंड्याच्या रस्त्याच्या दुरावस्थेची पोस्ट व्हायरल केली आहे.
नागरिकांनी आरोग्य सुदृढतेसाठी या रस्त्यावर चालण्याचे आवाहन या तरुणाने करून पालिकेचा ढिसाळपणा चव्हाट्यावर आणला आहे. आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॅम्प नंबर 4 मधील सुभाष टेकडी परिसरातील हा रस्ता आहे.
चौकात महानगरपालिकेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचे काम सुरू असून या पुतळ्याचे काम 14 एप्रिल या बाबासाहेबांच्या जयंतीदिनी पूर्वी पूर्णत्वास येईल की नाही हा संशोधनाचा विषय बनला आहे.
अशातच शेखर भालेराव चौकाच्या काही अंतराच्या पुढे क्रीतेश गायकवाड यांचे किराणा दुकान,सुहास म्हस्के आणि त्यापुढील घरे,शेखर गुजर यांची पिठाची गिरणी,व्ही.बी.ससाणे यांचे जुने रेशन दुकान आणि त्यापुढे दहाचाळ पर्यंत ड्रेनेज टाकण्यासाठी रस्ते खणून ठेवलेले आहेत.
मात्र त्यास बराच कालावधी उलटून गेला असून रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यापूर्वी ऐन रस्त्याच्या मधोमध दगडधोंडे टाकण्यात आले आहेत.त्यावरून चालण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असून वाहने पंक्चर होऊ लागले आहेत.
अशातच सुहास म्हस्के या तरुणाने या खोदलेल्या रस्त्याच्या दुरावस्थेची पोस्ट मासमीडियावर व्हायरल केली आहे.त्यात ब्लडप्रेशर,शुगर,गुडघ्याला व्यायाम,वजन कमी करण्यासाठी महानगरपालिकेकडून बनवण्यात येत असलेल्या या रस्ताचा आवश्य लाभ घ्यावा.
सकाळ संध्याकाळ या रस्त्यावर चालावे अशी बोचरी टिका या पोस्टमध्ये करण्यात आली आहे.14 एप्रिल या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी याच रस्त्यावरून अनुयायी वाजतगाजत चौकात जातात.यावेळेस या दगडधोंड्याच्या रस्त्यामुळे त्यांच्या आनंदावर विरजण पडणार काय?असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.