Ulhasngar News: ,9-2017 मध्ये पार पडलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत स्वतःच्या बळावर राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 नगरसेवक निवडून आणणारे,महाविकास आघाडीत अजित पवार हे उपमुख्यमंत्री असताना त्यांच्याकडून 25 कोटींचा विकासनिधी आणून 17 नंबर पॅनल मध्ये विकासकामांना झळाळी देणारे आणि राष्ट्रवादीचे दोन गट झाल्यावर अजित पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिलेले भारत गंगोत्री यांच्या गळ्यात उल्हासनगर राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष पदाची माळ पडली आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भारत गंगोत्री यांची उल्हासनगर जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती केली आहे.सदर नियुक्तीपत्र हे पक्षाचे कोषाध्यक्ष,जनरल सेक्रेटरी शिवाजीराव गर्जे यांच्या हस्ते गंगोत्री यांना देण्यात आले आहे.यावेळी राष्ट्रवादीचे नेते माजी खासदार आनंद परांजपे,माजी जिल्हाध्यक्षा सोनिया धामी,पदाधिकारी प्रवीण खरात,अनिल धामेजानी,शंकर धावानी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुरवातीला महाविकास आघाडीत व आता महायुती मध्ये आहेत.आम्ही त्यांच्याशी एकनिष्ठ असून त्यांची आम्हाला नेहमीच मोलाची साथ मिळत आहे.त्यामुळेच पॅनल नंबर 17 मध्ये विकासकामांना झळाळी मिळाली आहे.पक्षाने सोपवलेली जबाबदारी इमानेइतबारे पार पाडणार आणि पक्ष वाढवण्याचे काम करणार अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष भारत गंगोत्री यांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.