Ulhasnagar News: उल्हासनगरात पहिल्यादाच कर निर्धारक पदावर पालिकेच्या महिला अधिकारी!

Ulhasnagar Municipal Corporation: निलम कदम-बोडारे ह्या शिक्षण मंडळ असताना 2008 मध्ये लिपिक या पदावर कामावर रुजू झाल्या होत्या |
 उल्हासनगरात पहिल्यादाच कर निर्धारक पदावर पालिकेच्या महिला अधिकारी!
Ulhasnagar Newssakal
Updated on

Ulhasnagar news: आयुक्त अजीज शेख यांनी उल्हासनगर महानगरपालिका मालमत्ता कर(टॅक्स)विभागाच्या कर निर्धारक व संकलक पदावर निलम कदम-बोडारे यांची प्रभारी नियुक्ती केली आहे.

आजमिती पर्यंतच्या इतिहासात या पदावर नियुक्त करण्यात आलेल्या त्या महानगरपालिकेच्या पहिल्याच महिला अधिकारी ठरल्या असून त्यांनी या पदाचा पदभार स्विकारला आहे.

 उल्हासनगरात पहिल्यादाच कर निर्धारक पदावर पालिकेच्या महिला अधिकारी!
Ulhasnagar Municipal Corporation : उल्हासनगरातील अतिरिक्त आयुक्तांच रिक्त पद 10 महिन्यांनी भरले

निलम कदम-बोडारे ह्या शिक्षण मंडळ असताना 2008 मध्ये लिपिक या पदावर कामावर रुजू झाल्या होत्या.2019 साली त्यांची शिक्षण मंडळात उपलेखा अधिकारी पदावर पदोन्नती करण्यात आली.

पुढे महाराष्ट्र शासनाने शिक्षण मंडळ बरखास्त केल्यावर महानगरपालिकेच्या अधिपत्याखाली सप्टेंबर 2023 मध्ये शिक्षण मंडळाचे समायोजन शिक्षण विभागात झाले.सदर समायोजनानुसार निलम कदम-बोडारे यांचे उपमुख्य लेखाधिकारी या पदावर समायोजन करण्यात आले.

 उल्हासनगरात पहिल्यादाच कर निर्धारक पदावर पालिकेच्या महिला अधिकारी!
Ulhasnagar: अजीज शेखांची राज्यभर चर्चा, सेवनिवृत्तीच्या तोंडावर आयएएसचे यश व मुदतवाढ

कर निर्धारक व संकलक हे अ वर्ग अधिकाऱ्याचे पद असून बऱ्याच वर्षांपूर्वी या पदावर मंत्रालयातील विजया कंठे ह्या प्रतिनियुक्तीवर आल्या होत्या.काही वर्षांपासून या पदावर मालमत्ता कर विभागातील वरिष्ठ लिपिक जेठानंद करमचंदानी यांची प्रभारी नियुक्ती करण्यात आली होती.यावेळेस मात्र आयुक्त अजीज शेख यांनी प्रथमच या पदाची जबाबदारी पालिकेतील महिला अधिकारी निलम कदम-बोडारे यांच्यावर सोपवली आहे.

 उल्हासनगरात पहिल्यादाच कर निर्धारक पदावर पालिकेच्या महिला अधिकारी!
Ulhasnagar: महानगरपालिकेने हस्तांतरित केलेल्या हॉस्पिटलच्या सुरक्षारक्षकाची कर्जापोटी संपवले जिवन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.