Ulhasnagar News: उल्हासनगरातील कारवाई मुळे वाहनात अमाप रोकड नेणाऱ्यांना भरारी पथकाची धडकी

Ulhasnagar News: उल्हासनगरातील कारवाई मुळे वाहनात अमाप रोकड नेणाऱ्यांना भरारी पथकाची धडकी
Updated on

,

उल्हासनगर,ता,13-निवडणुकीच्या कालावधीत कॅशवर व इतर बाबींवर वॉच ठेवण्यासाठी नेमण्यात आलेल्या उल्हासनगरातील भरारी पथकाने कॅशच्या क्यूआर कोडची तफावत असलेल्या एका बँकेची 1 कोटी 8 लाख रुपयांची कॅश असलेली गाडी ताब्यात घेतली होती.

या कारवाईमुळे वाहनात अमाप रोकड नेणाऱ्यांना भरारी पथकाची धडकी भरली असून या पथकाला डोंबिवलीच्या बैठकीत शाबासकी देण्यात आली आहे.

उल्हासनगरात 9 भरारी पथके नेमण्यात आली आहेत.त्यातील एका भरारी पथकाचे प्रमुख अजित घोरपडे,सचिन वानखेडे व पोलीस किशोर वंजारी यांनी काही दिवसांपूर्वी सेंचुरी कंपनीजवळ सीएमएस बँकेची गाडी अडवली.गाडीत मोठ्या प्रमाणावर कॅश असल्याने पथकाने क्यूआर कोडची मागणी केली.

मात्र त्यांच्याकडून खात्रीशीर उत्तर मिळाले नसल्याने सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा यांच्या आदेशानुसार ती गाडी ताब्यात घेऊन उल्हासनगर पोलीस ठाण्यात नेण्यात आली.

इन्कम टॅक्स विभागाला पाचारण करण्यात आले.गाडीतील कर्मचाऱ्यांकडे 77 लाख रुपये कॅशचा क्यूआर कोड होता.मात्र सकाळपर्यंत मोजणी करण्यात आली असता गाडीत 1 कोटी 8 लाखाच्या वर कॅश मिळून आली असून त्याबाबतच्या क्यूआर कोड बाबत समाधानकारक उत्तर मिळाले नव्हते.या कारवाईमुळे दुसऱ्या दिवशी सीएमएस बँकेच्या अडीचशे गाड्या क्यूआर कोड शिवाय बाहेर पडल्या नव्हत्या.

इन्कम टॅक्स विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्व गोष्टी पडताळून ताब्यात घेतलेली कॅश जप्त करण्याची गरज नसल्याचा क्लिनचीट रिपोर्ट दिलेला आहे.इन्कम टॅक्स विभागाने क्लिअरन्स सर्टिफिकेट दिलेले असले तरी जिल्हा स्तरावर कॅश सीजर रिलीज़ कमिटी असून त्यांना प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.त्यांच्याकडून आदेश आल्यावर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.मात्र या कारवाईमुळे भरारी पथकाची धडकी घेण्यात आल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विजयानंद शर्मा यांनी दिली आहे.

दरम्यान 10 तारखेला कंडोमपाच्या डोंबिवली मधील जलतरण तलाव कार्यालयातील वै.ह.भ.प सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडासंकुलात 24-कल्याण लोकसभा मतदार संघातील सर्व विधानसभा मतदार संघातंर्गत कार्यरत सहायक खर्च निरीक्षक व पथकातील पथक प्रमुखांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

त्यात खर्च पथक प्रमुख किरण भिलारे यांनी उल्हासनगरातील भरारी पथकाने केलेल्या कामगिरीला शाबासकी दिली आहे.यावेळी सहायक खर्च निरीक्षक शरद देशमुख,उल्हासनगर आचारसंहिता पथक प्रमुख डॉ.सुभाष जाधव,भरारी पथक प्रमुख अजित घोरपडे,सचिन वानखडे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.