Ulhasnagar: उल्हासनगरात ना बिजेपी ना शिवसेना ओन्ली शरदचंद्र पवार यांचाच पक्ष

Ulhasnagar: ओमी कलानी विधानसभा निवडणूक तुतारी चिन्हावरच लढणार, राष्ट्रवादीची पत्रकार परिषदेत माहिती
ulhasnagar omi kalani ncp assembly elections sharad pawar party only contest election
ulhasnagar omi kalani ncp assembly elections sharad pawar party only contest election sakal
Updated on

उल्हासनगर: ओमी कलानी हे भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेनेकडून उल्हासनगर विधानसभेची निवडणूक लढवणार अशी अफवा विरोधक पसरवून खच्चीकरण करण्याचा खटाटोप करत आहेत.मात्र ओमी कलानी हे ना बिजेपी ना शिवसेना ओन्ली शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या तुतारी या चिन्हावर विधानसभा निवडणुकीत उतरणार असून येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीतही तुतारीच वाजणार असा ठाम विश्वास राष्ट्रवादीचे प्रवक्ते कमलेश निकम,मनोज लासी यांनी व्यक्त केला आहे.

लोकसभा निवडणुकीत ओमी कलानी यांनी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्यासोबत दोस्ती गठबंधन करून प्रचार करताना विधानसभा निवडणूक लढवणार असे ओमी कलानी यांनी जाहीर केले होते.त्याचा बाऊ विरोधक करत असून मसमीडियावर दिशाभूल करणाऱ्या पोस्ट टाकल्या जात आहेत.ओमी कलानी यांनी भाजप,शिवसेना यांच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतलेल्या नसून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्याच पक्षाला प्राधान्य दिलेले आहे.ही निवडणूक जिंकण्यासाठी अकराशे पदाधिकाऱ्यांची टीम आणि व्यापारी संघटनांचे सुमित चक्रवर्ती,अजित माखीजानी,पितु राजवानी,राजेश टेकचंदानी,नरेश दुर्गानी यांची टीम ऍक्टिव्ह असल्याचे कमलेश निकम,मनोज लासी यांनी सांगितले.

ulhasnagar omi kalani ncp assembly elections sharad pawar party only contest election
NCP MLA disqualification: आमदार अपात्रता प्रकरणी आज सुनावणी; शरद पवारांची 'ही' मागणी सुप्रीम कोर्ट मान्य करणार?

विधानसभा निवडणुकीसाठी गोव्यामध्ये टीम ओमी कलानी यांची कोअर कमिटीची घोषणा केल्यावर आणि 25 समस्यांचा मेनिफेस्टो जाहीर केल्यानंतर हा मेनिफेस्टो राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या लेटरपॅडवर असायला हवा अशा सूचना राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिल्या होत्या.त्यानुसार जिल्हाध्यक्ष पंचम कलानी ह्या राष्ट्रवादीच्या लेटर पॅडवर पाठपुरावा करत आहेत.

शरद पवार आणि पप्पू कलानी यांची मैत्री जगजाहीर असून पवार यांनी कलानी यांच्यावर तीन विधानसभेच्या प्रचाराची जबाबदारी सोपवलेली आहे.त्यामुळे कुणी कितीही तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न केले तरी ओमी कलानी हेच विधानसभेचे उमेदवार असणार त्यानुसार वरिष्ठांच्या आदेशान्वये ही पत्रकार परिषद घेण्यात आल्याचे कमलेश निकम,मनोज लासी म्हणाले.यावेळी पदाधिकारी संतोष पांडे,अजित माखीजानी,पंकज त्रिलोकानी,आनंद शिंदे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.