Ulhasnagar: पोलिसांची फिल्मी कामगिरी, दरोडा टाकण्यापूर्वीच आवळल्या 5 गुंडांच्या मुसक्या

Mumbai Crime News : पिस्तूल,मॅगझीन,जिवंत काडतुसे जप्त,हिललाईन पोलिसांची कामगिरी
Ulhasnagar: पोलिसांची फिल्मी कामगिरी, दरोडा टाकण्यापूर्वीच आवळल्या 5 गुंडांच्या मुसक्या
Updated on

दिनेश गोगी

Ulhasngar: सोमवारी रात्रीच्या सुमारास।एका ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकण्यापूर्वीच 5 गुंडांच्या मुसक्या आवळण्याची थरारक कामगिरी उल्हासनगरातील हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या टीमने केली आहे.या गुंडांकडून पिस्तूल,मॅगझीन,जिवंत काडतुसे,मिरची पूड,वायर,रस्सी जप्त करण्यात आले असून दोघांचा फिल्मी स्टाईलने पाठलाग करून त्यांना जेरबंद करण्यात आले आहे.

रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार युवराज पवार आणि राहुल गायकवाड यांनी आपल्या साथीदारांसोबत मिळून एका इसमाला 22 जुलै रोजी पूर्व वैमनस्यातून मारहाण केली होती.त्यानंतर त्यांनी नेताजी चौक येथील दुकानदारांना पिस्तूलचा धाक दाखवत दरमहिना 5 हजार रुपयांची खंडणीची मागणी केली होती.

हे सराईत गुन्हेगार हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सतत दहशत माजवण्याचा प्रयत्न करत असल्याने पोलीस उपायुक्त डॉ.सुधाकर पठारे,सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश वराडे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक नेमण्यात आले होते.

दरम्यान हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या नेवाळी नाका येथील महालक्ष्मी ज्वेलर्स या दुकानदार हे सराईत गुन्हेगार आपल्या साथीदारांसोबत दरोडा टाकणार असल्याची माहिती पोलिसांना एका गुप्त माहिती बातमीदारा मार्फत पोलिसांना मिळाली मिळाली होती.त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून

युवराज पवार,राहुल गायकवाड,वासुदेव फकिरा,कल्पेश बाविस्कर,अजय उर्फ कोयता पिल्ले या पाच आरोपींच्या मुसक्या आवळल्याआहेत.

विशेष म्हणजे यातील दोन आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून जात होते.मात्र त्यांचा फिल्मी स्टाईल पाठलाग करून त्यांनाही जेरबंद केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.