"...तर CM ठाकरेच नव्हे, PM मोदीही तुमच्याकडे येतील"

"...तर CM ठाकरेच नव्हे, PM मोदीही तुमच्याकडे येतील"
Updated on

सर्वजण एकत्र या अन् जीएसटी भरायला नकार द्या, मग बघा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच नव्हे पंतप्रधान नरेंद्र मोदीही तुमच्याकडे येतील, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लहान बंधू प्रल्हाद मोदी यांनी उल्हासनगरच्या व्यापाऱ्यांना केलं. उल्हासनगर ट्रेड असोसिएशनच्या वतीनं आयोजित व्यापाऱ्यांशी संवाद कार्यक्रमाला प्रल्हाद मोदी यांनी शुक्रवारी उपस्थिती दर्शवली होती. त्यावेळी व्यापाऱ्यांचं त्यांनी मनोबल वाढवलं. रेफ्युजी म्हणून किती दिवस रडत बसणार आहात? एकीचं बळ दाखवा आणि आता लढायला शिका, असं आवाहन मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांनी केलं.

ऑल इंडिया फेअर प्राईझ शॉप या असोसिएशनचे प्रल्हाद मोदी राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. कोरोना संकटात व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. दोन वर्षांपासून त्यांच्या अडचणी संपण्याचं नाव घेत नाहीत. अशा परिस्थितीतही सरकारकडून कोणतीही मदत मिळत नाही. त्यामुळेच आपला आवज सरकारपर्यंत पोहचण्यासाठी उल्हासनगर ट्रेड असोसिएशन या व्यापाऱ्यांच्या संघटनेनं प्रल्हाद मोदी यांना निमंत्रित केलं होतं.

"...तर CM ठाकरेच नव्हे, PM मोदीही तुमच्याकडे येतील"
मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख, अजित पवारांनी राणेंना सुनावले

उल्हासनगर येथील व्यापाऱ्यांनी आपल्या समस्या प्रल्हाद मोदी यांच्याकडे मांडल्या. तसेच केंद्र सरकारपर्यंत आपला आवाज पोहोचवण्याचीही मागणी केली. तुमच्या शहराचा विकास होत नसेल, तुम्हाला सोयी सुविधा मिळत नसतील तर सामूहिकपणे जीएसटी भरायला नकार द्या, मग पाहा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच नव्हे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदीही तुमच्याकडे येतील.

"...तर CM ठाकरेच नव्हे, PM मोदीही तुमच्याकडे येतील"
ठाकरे सरकारची बदनामी; एसटी कर्मचारी निलंबित

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()