Ulhasnagar: पालिका कर्मचाऱ्यांचा 31 तारखेलाच पगार, मात्र 2 हजार दिव्यांग मानधनापासून वंचित !

Ulhasnagar Muinicipal Corporation| आयुक्त विकास ढाकणे यांच्यामुळे पहिल्यांदाच दुसऱ्या महिन्याची तारीख येण्यापूर्वीच पगार झाल्याने सर्वच कमालीचे सुखावून गेले.
Ulhasnagar: पालिका कर्मचाऱ्यांचा 31 तारखेलाच पगार, मात्र 2 हजार दिव्यांग मानधनापासून वंचित !
Updated on

Latest Thane News | 10-पहिल्यांदाच उल्हासनगर महानगरपालिकेत कार्यरत 2200 कर्मचारी आणि 1800 सेवनिवृत्तांचा पगार हा 31 ऑगस्ट रोजीच करण्यात आला आहे.त्यामुळे ऐन गणेशोत्सवात कर्मचाऱ्यात आनंदाचे वातावरण आहे.

असे असताना शहरातील 2199 दिव्यांगांना त्यांच्या मासिक मानधनापासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.स्वप्निल पाटील यांनी केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.