Ulhasnagar: महानगरपालिकेने हस्तांतरित केलेल्या हॉस्पिटलच्या सुरक्षारक्षकाची कर्जापोटी संपवले जिवन

रुग्णालयाकडून 3 लाखाचा धनादेश
Ulhasnagar: महानगरपालिकेने हस्तांतरित केलेल्या हॉस्पिटलच्या सुरक्षारक्षकाची कर्जापोटी  संपवले जिवन
Updated on

UMNP: महानगरपालिकेने हस्तांतरित केलेल्या झिरो कॅश काऊंटर सुपर मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या राजू धाटावकर याने सोमवारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला होता.

6 महिन्यापासून हॉस्पिटल प्रशासनाने पगार दिला नसल्याने राजूने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप राजूच्या परिवाराने केला होता.मात्र हॉस्पिटल प्रशासनाच्या वतीने डॉ.संचित पॉल यांनी हा आरोप फेटाळला फेटाळून लावला.

राजूने कर्जापोटी आत्महत्त्या केल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे.तसेच माणूसकीच्या दृष्टीने राजूच्या कुटुंबियांना 3 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आल्याचे डॉ.संचित पॉल यांनी सांगितले.

Ulhasnagar: महानगरपालिकेने हस्तांतरित केलेल्या हॉस्पिटलच्या सुरक्षारक्षकाची कर्जापोटी  संपवले जिवन
Ulhasnagar News : पावसाळ्याच्या तोंडावर उल्हासनगर पालिका अ‍ॅक्शन मोडवर! चार अतिधोकादायक इमारतींचे पाडकाम केले सुरू

कोविडच्या कालावधीत उल्हासनगर महानगरपालिकेने म्हारळच्या हद्दीत हे हॉस्पिटल उभारले होते.पण कोविड आटोक्यात आल्याने जवळपास दोन वर्ष हे हॉस्पिटल धूळ खात पडले होते.अजीज शेख यांनी पदभार हाती घेतल्यावर त्यांनी हे हॉस्पिटल प्लॅटिनम हॉस्पिटलचे डॉ.संजीत पॉल यांच्याकडे हस्तांतरित करून त्याचे रूपांतर सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये करण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार डॉ.पॉल यांनी या हॉस्पिटलचा कायापालट केल्यावर फेब्रुवारी महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,मंत्री रवींद्र चव्हाण,खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते या हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला होता.याच हॉस्पिटलचे कायापालट करण्याचे काम सुरू असताना राजू धाटावकर याला गणपती मंदिराची देखरेख आणि पूजाअर्चाना करण्याचे काम देण्यात आले होते.पुढे त्याची सुरक्षारक्षक पदावर नेमणूक करण्यात आली.

Ulhasnagar: महानगरपालिकेने हस्तांतरित केलेल्या हॉस्पिटलच्या सुरक्षारक्षकाची कर्जापोटी  संपवले जिवन
Ulhasnagar News: सेवनिवृत्तीला आठवडा बाकी असतानाच उल्हासनगर पालिका आयुक्त झाले आयएएस

त्याच्या अकाऊंटमध्ये पगार पाठवण्यात येत होता.पण काही दिवसांपासून तो कामावर येत नसल्याने त्याला हॉस्पिटल मधून अनेकदा फोन करण्यात आले.राजूने आत्महत्या केल्याची दुःखद बातमी कळल्यावर त्याने कर्जापोटी आणि कर्ज मागणारे हॉस्पिटलमध्ये येतील या भीतीने त्याने आत्महत्येचा मार्ग निवडला अशी माहिती समोर येत असून पोलिसांनी त्यांचा शोध घ्यावा अशी मागणी देखील डॉ.संचित पॉल यांनी केली.राजू धाटावकर हा चांगल्या स्वभावाचा होता.त्याने कर्जा विषयी सांगितले असते तर त्याला सहकार्य केले असते.आज तो हयात नसल्याने त्याच्या कुटुंबियांना 3 लाख रुपयांचा धनादेश दिल्याचे डॉ.संचित पॉल म्हणाले.

हॉस्पिटलला बंद करण्याचा खटाटोप

या हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले योजने अंतर्गत तब्बल 108 प्रकारचे उपचार,शस्रक्रिया विनामूल्य करण्यात येत असल्याने हे हॉस्पिटल काहींच्या डोळ्यात खुपू लागले आहे.त्यामुळे हे हॉस्पिटल बंद करण्याचा खटाटोप काही मंडळींकडून सुरू असल्याचा आरोपही डॉ.संचित पॉल यांनी केला आहे.

Ulhasnagar: महानगरपालिकेने हस्तांतरित केलेल्या हॉस्पिटलच्या सुरक्षारक्षकाची कर्जापोटी  संपवले जिवन
Ulhasnagar News : उल्हासनगरातील 251 मतदान केंद्रावर 1255 अधिकारी-कर्मचाऱ्यांचा ताबा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.