उल्हासनगर: ठाणे शहरातील क्राइम ब्रांचच्या एंटी ह्युमन ट्रॅफिकिंग सेल (AHTC) ने उल्हासनगरात मारलेल्या धाडसत्रात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.या धाडीत किरण राजदेव या दलाल महिलेला अटक करण्यात आली असून, दोन पीडित तरुणींना वेश्याव्यवसायाच्या जाळ्यातून सुटका करण्यात आले आहे.
AHTC च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, उल्हासनगर मधील मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कार बाजार, जय माता दी नगर, शांतिनगर या परिसरात फाल्कन हॉटेल जवळ एक महिला दलाल तरुणींना देहव्यापारासाठी ग्राहकांना पुरवण्याच्या उद्देशाने येणार होती. या माहितीनुसार, AHTC ठाणे शहरच्या टीमने तत्काळ कारवाई करत, बोगस ग्राहक आणि पंचांना पाठवून योजनाबद्ध रीतीने सापळा रचला.
सापळा यशस्वी ठरला आणि छापा मारून किरण राजदेव या दलाल महिलेला अटक केली.या महिलेच्या ताब्यातून दोन पीडित तरुणींची सुटका करण्यात आली आहे.प्राथमिक तपासात ही दलाल महिला गेल्या दोन ते तीन वर्षांपासून या धंद्यात सक्रिय असून ती तरुणींना देहव्यापाराच्या दलदलीत ओढण्याचे काम करत असल्याचे उघड झाले आहे.
आरोपी महिलेवर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली आणि पीटा (PITA) कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून सुटका करण्यात आलेल्या पीडित तरुणींना सुरक्षिततेसाठी महिला सुधारगृहात पाठविण्याची प्रक्रिया सुरू केली गेली आहे.
हे धाडसत्र ठाणे शहर क्राइम ब्रांचच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी,पोलीस उपनिरीक्षक निलेश क्षीरसागर,डी. व्ही.चव्हाण,श्रद्धा कदम, डी.वालघुडे, डी.मोहिते,के.बि.पाटील,हर्षिता थोरात,पुनम खरात आणि किरण चांदेकर यांनी संयुक्तपणे केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.